Saturday, June 29, 2024

कलाकारांची दमदार फळी असणारा फकाट ‘या’ दिवशी हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट असतेच, हीच गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून हे पोस्टर चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवणारे आहे. पोस्टरमध्ये हेमंत ढोमेच्या हातात एक ‘एलओसी सिक्रेट’ची फाईल दिसत असून सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, महेश जाधव, किरण गायकवाड ही फाईल मिळवण्यासाठी खेचाखेची सुरु आहे. अनुजा साठे आणि रसिका सुनील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कबीर दुहान सिंग त्या सगळ्यांच्या मागे उभा दिसत असून त्याच्या हातात दोन बंदुका दिसत आहेत. त्यामुळे आता हे ‘एलओसी सिक्रेट’ प्रकरण नेमके काय आहे, याचे सिक्रेट 2 जूनलाच उघड होणार आहे. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ” चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आम्ही बदलली असून हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे. हा एक धमाल विनोदी, कौटुंबिक चित्रपट असून तो प्रेक्षकांनी पाहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. चित्रपटातील कलाकारही एकदम ‘फकाट’ आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटगृहातून बाहेर पडताना पैसा वसूल धमाल कॅामेडी, अॅक्शन चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच असेल.” असे श्रेयश जाधव यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले. (Fakat, which has a strong line-up of actors, will be released in theaters only on ‘this’ day)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तेजस्वी प्रकाशचा बाेल्ड अंदाज पाहून चाहते घायळ

राम चरणच्या पत्नीचा प्रेग्नंसीबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘आम्ही फार वर्षांपूर्वीच …’

हे देखील वाचा