मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून एकवर एक दु:खत बातमी येत आहेत. मंगळवारी (12 सप्टेंबर) प्रसिद्ध बॉलीवूड निर्माते मुकेश उदेशी यांचे दु:खत निधन झाले. त्यांच्या निधनची बातमी ऐकून संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली होती. त्यात आता अभिनेते सतिंदर कुमार खोसला उर्फ बिरबल यांचे निधन झाले आहे. विनोदी अभिनेते सतिंदर कुमार खोसला गुरूवारी ( 12 सप्टेंबर) सायंकाळी 7.30 वाजता निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
झालं असं की, बिरबल यांच्या डोक्यावर घराच्या छताचा एक तुकडा पडला होता. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. बिरबल (Satinder Kumar Khosla Passes Away) यांच्या डोक्यात दोन ठिकाणी जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ती जखम खूप खोल गेली होती. त्यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. या दुखापतीनंतर बिरबल यांच्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशन होऊन दोन महिने उलटून गेले तरीही त्यांची प्रकृती सुधारली नाही.
‘धारावाहिक’ या मालिकेतील बिरबल यांची भूमिका खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या त्या भूमिकेमुळे त्यांना जगभरात ओळखले मिळाली. 1967 मध्ये त्यांनी मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ या आयकॉनिक चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. यानंतर त्यांनी जवळपास 500 हून अधिक चित्रपटात काम केले. त्यांची विनोदी भूमिका नेहमीच प्रेक्षकांना आवडत असे. बिरबल यांनी मराठी, हिंदी , पंजाबी आणि भोजपुरी अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
मनोज कुमार आणि राज खोसला सतिंदर असे नविन नाव दिले. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी आपले नाव बदलून बिरबल ठेवले. मनोज कुमार यांच्या ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘क्रांती’ या चित्रपटातमधील बिरबल यांच्या भूमिका खूप गाजले आहेत. बिरबल यांनी शोले, सुरत या चित्रपटामध्ये कैद्याची भूमिका केली होती. आनंद देव यांच्या ‘अमीर गरीब’ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. सतिंदर कुमार यांच्या निधनावर त्यांच्या चाहत्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Famous comedian actor Satinder Kumar Khosla passed away)
अधिक वाचा-
–अभिनेत्री बनण्यासाठी घरातून गेल्या होत्या पळून, ‘असा’ आहे उषा नाडकर्णी यांचा जीवन प्रवास
–निखळ सौदर्यांची खाण असलेल्या प्राजक्ताचे आंबा कलरच्या साडीत खुललं रूप, पाहा फोटो