प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे शुक्रवारी (दि. 11 नाेव्हेंबर)ला वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. अभिनेता सिद्धांत वीर याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. असे सांगितले जात आहे की, अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी जिममध्ये वर्कआउट करत होता, त्यादरम्यान तो जमिनीवर पडला. अभिनेत्याला जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरांनी सिद्धांत (Siddhaanth Vir Surryavanshi) याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही. अलीकडेच लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांनाही जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता, जवळपास 45 दिवस हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आधी ‘भाभी जी घर पर हैं’ फेम अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) यांचाही वर्कआऊटदरम्यान मृत्यू झाला होता.
View this post on Instagram
जयने शाेक व्यक्त करत दिली मृत्यूची माहिती
टीव्ही अभिनेता जय भानुशालीने सिद्धांतच्या मृत्यूची माहिती दिला. जय म्हणाला, “भाऊ, तू खूप लवकर निघून गेलास.” जयने सिद्धांतच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की, “ही बातमी मलाही एका कॉमन मित्राकडून मिळाली. जिममध्ये कसरत करत असताना त्याचा मृत्यू झाला.” जय भानुशालीने इंस्टास्टोरीमध्ये सिद्धांतचा फोटो शेअर करून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला.

सिद्धांत याने या दमदार मालिकेत केल काम
सिद्धांत वीर सूर्यवंशी एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. त्यांनी ‘कुसुम’, ‘वारीस’ आणि ‘सूर्यपुत्र करण’ यांसारख्या अनेक दमदार मालिकांमध्ये काम केले.(famous actor siddhaanth vir surryavanshi dies at the age of 46 falls while working out in gym)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री नेहा मालिकचा नवा लूक पाहिलात का?
श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये










