Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड Shocking! कॉस्मेटिक सर्जरी करणं जीवावर बेतलं, लोकप्रिय अभिनेत्रीने 29व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shocking! कॉस्मेटिक सर्जरी करणं जीवावर बेतलं, लोकप्रिय अभिनेत्रीने 29व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अभिनेत्री लुआना आंद्राडेचा कॉस्मेटिक सर्जरी दरम्यान मृत्यू झाला आहे. 29 वर्षीय या अभिनेत्रीला लिपोसक्शन शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गाठ तयार झाल्याने हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.लुआना आंद्राडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.

लुआना (Luana Andrade) सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय होती. तिच्या निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास लुआनाला मृत घोषित करण्यात आले. लुआना आंद्राडेच्या मृत्यूची माहिती कळताच ब्राझीलमधील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारने तिच्या निधनाबद्दल ट्विट करत तिच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली.

फुटबॉलपटू नेमारने पोर्तुगीजमध्ये लुआनालाबद्दल ट्विट करताना लिहिले की, “माझी मैत्रिण लुआनाचा मृत्यू झाला आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.” लुआना आंद्राडेचा मृत्यू हा कॉस्मेटिक सर्जरीच्या वाईट परिणामांवर एक चेतावणी आहे. कॉस्मेटिक सर्जरी ही एक गंभीर प्रक्रिया आहे आणि ती करायची असेल तर योग्य तज्ञ डॉक्टरांकडूनच करणे आवश्यक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 त्याचवेळी लुआनाचा बॉयफ्रेंड, जोआओ हदादने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिले की, “मी तुटलो आहे आणि माझे सर्वात मोठे दुःखद स्वप्न अनुभवत आहे. माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग मला सोडून गेला. मी तुझ्यावर कायम प्रेम करेन” सॅन लुईस हॉस्पिटलमध्ये लिपोसक्शन शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गाठ पडल्याने लुआना आंद्राडेचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. (Famous actress Luana Andrade died during cosmetic surgery)

आधिक वाचा-
लहानपणी दिवाळीमध्ये फटाक्यांऐवजी सलमानने जाळले होते पैसे, अशी दिली होती बापाने शिक्षा
‘आयी है दिवाली’ ते ‘बोले चुडियाँ’, ‘ही’ गाणी बनवतील तुमची यंदाची दिवाळी आणखी खास

हे देखील वाचा