Wednesday, January 14, 2026
Home अन्य दुख:द! प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन, वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दुख:द! प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन, वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन क्षेत्रातील बंगाली चित्रपटसृष्टीतून एक दुःखद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी (sandhya mukharjee) यांचे कोलकत्त्यामधील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले होते. मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक होती. परंतु मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. ६०- ७० च्या दशकात आपल्या सुमधुर आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संध्या यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहे. त्यांना केवळ बंगाली चित्रपटसृष्टी नव्हे, तर संपूर्ण भारतात ओळखतात. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक काळा पसरली आहे.

दिवंगत गायिका संध्या मुखर्जी यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी कोलकत्ता येथे झाला होता. त्यांनी लहान असताना पंडित संतोष कुमार बासू प्रोफेसर ए.टी. कन्नन आणि प्रोफेसर चिन्मय लहरी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी केवळ बंगाली नाही, तर अनेक हिंदी गाणी देखील गायली आहेत. त्यांचे बंगाली गायक हेमंता मुखर्जी यांच्यासोबत डूएट गाणे सगळ्यांना आवडत होते. त्यामुळे त्यांना एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. (Famous Bengali singer Sandhya Mukherjee died in a private hospital in kolkatta)

संध्या मुखर्जी यांनी २०११ साली पश्चिम बंगाल सरकारद्वारा सर्वोच्च नागरिक सन्मान बंगा विभूषण या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना १९७० साली सर्वश्रेष्ठ पार्श्व महिला गायिका हा पुरस्कार देखील देण्यात आला होता.

संध्या मुखर्जी तेव्हा जोरदार चर्चेत आल्या होत्या जेव्हा त्यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी नकार दिला होता. २६ जानेवारी रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांची मुलगी सौमीने सांगितले होते की, तिच्या आईने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नकार दिला आहे. त्यांनी असे सांगितले होते की, वयाच्या ९० व्या वर्षी हा पुरस्कार देणे ही अपमानकारक गोष्ट आहे. त्यानंतर त्या खूप चर्चेत आल्या होत्या. आज त्यांच्या निधनाने अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा

हेही पाहा-

हे देखील वाचा