Tuesday, February 3, 2026
Home भोजपूरी धक्कादायक.! भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा हादरा; प्रसिद्ध गीतकाराचे कोरोनाने निधन

धक्कादायक.! भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा हादरा; प्रसिद्ध गीतकाराचे कोरोनाने निधन

भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. भोजपुरीतील सुप्रसिद्ध गीतकार श्याम देहाती याचे सोमवारी (१९ एप्रिल) निधन झाले. कोरोना या साथीच्या आजारामुळे त्याला जीव गमवावा लागला. श्याम देहातीने खेसारीलाल यादव, काजल राघवानी यासारख्या प्रसिद्ध भोजपुरी कलाकारांची गाणी लिहिली आहेत. श्यामच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीला हादरा बसला आहे.

श्याम देहाती २ दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे त्याला गोरखपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पीआरओ रंजन सिन्हा यांनी सांगितले की, तो कोरोना कालावधीत एक-दोन वेळा मुंबईलाही गेला होता. आज त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पवनसिंग, खेसारीलाल यादव यांच्यासह भोजपुरी सिनेमामधील अनेक कलाकारांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्याम त्याच्या मागे पत्नी व दोन मुले सोडून गेला आहे. अलीकडेच श्यामने स्वत: चा ‘प्युअर देहाती’ नावाचा वेफर ब्रँडसुद्धा सुरू केला होता, ज्याचा प्रचार तो सोशल मीडियावर करत होता.

श्याम देहातीने अनेक दिग्गज भोजपुरी कलाकारांना यशाच्या शिखरावर पोहचायला मदत केली आहे. त्याने सुपरस्टार खेसारी लाल यादव, काजल राघवानी, दिनेश लाल यादव निरहुआ, प्रदीप पांडे चिंटू, पवन सिंग अशा अनेक सुप्रसिद्ध कलाकारांचे चित्रपट आणि गाणी तयार केली आहेत.

श्याम हा ग्रामीण बिहारमधील बेतियाचा रहिवासी होता. २००६ मध्ये आपली कारकीर्द घडवण्यासाठी तो मुंबईत आला होता. सुपरस्टार निरहुआच्या ‘निरहुआ रिक्शावाला’ या चित्रपटापासून त्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली होती. याच चित्रपटातील निरहुआचे ‘मिसिर जी तू तो बड़ा बड़ा ठंडा’ हे गाणे खूप गाजले होते. आजही प्रेक्षक मोठ्या उत्साहाने हे गाणे ऐकतात.

हे देखील वाचा