‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

Famous Bollywood Actress Tabu Completed 30th Year As An Actor In Industry


आपल्या अभिनयाने नव्वदचे दशक गाजवलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू हिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. ती प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडते. तिच्या सुंदरतेसोबतच तिच्या दमदार अभिनयाचे करोडो चाहते दिवाने आहेत. तब्बूने चित्रपटसृष्टीतील आपली ३० वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासाबद्दल तिने वक्तव्य केले आहे.

तब्बूने एका मुलाखतीमध्ये म्हटले की, “आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करून ३० वर्षे कधी लोटली काही कळलंच नाही.” ती म्हणाली, “मी अजूनही जुनीच तब्बू आहे. मी ‘प्रेम’, ‘बीवी नंबर १’, ‘मकबूल’, ‘हैदर’, ‘हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. मी कधीच काहीही योजनेनुसार केले नाही. जे काम माझ्याकडे आले आणि ते जेव्हा मला आवडले, तेव्हाच ते मी केले. मला सर्व शैलीतील चित्रपट करायचे आहेत.”

तब्बूने ‘द नेमशेक’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘अ सुटेबल बॉय’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय सिनेमातही काम केले आहे. याबाबत बोलताना तिने म्हटले की, “मला राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय, प्रत्येक ठिकाणी चांगल्या भूमिका मिळाल्या आहेत. सर्व भूमिका दमदार होत्या. सोबतच चित्रपटांची कहाणी आणि कास्ट खूप चांगले होते.”

खूप कमी चाहत्यांना माहिती आहे की, तिने ३० वर्षांपूर्वी तेलुगु ‘कुली नंबर १’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. याच चित्रपटाचा रिमेक डेविड धवन यांनी केला होता. त्यामध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या तब्बूचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे.

तब्बूला २५ वर्षांपूर्वी ‘माचिस’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळाला, तेव्हा तिने म्हटले की, “पुरस्कार मिळाल्याने सर्वांनाच आनंद होतो. जेव्हा मला माचिससाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. मला वाटले की, माझ्यासोबत असे कसे काय होत आहे? म्हणजे मी इतके चांगले काम केले की, मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज
-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते


Leave A Reply

Your email address will not be published.