आपल्या अनोख्या फॅशनेबल अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिली पोर्टरने, अलीकडेच उघड केले की तिला २००७ मध्ये एचआयव्हीचे निदान झाले होते. ती तब्बल १४ वर्षांपासून एचआयव्हीशी झुंज देत आहे आणि आता तिने याबद्दल जाहीरपणे उघड केले आहे.
ती म्हणाली की, “मला असे वाटते की, हे सत्य सांगितल्यानंतर मला लाज घेऊन जगावे लागणार नाही.” बिली पोर्टरने उघडपणे कबूल केले की, तिच्याशी भेदभाव होऊ नये म्हणून तिने एड्सबद्दल लपवले होते. जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना या आजारामुळे लाज बाळगावी लागते.
एड्सबद्दल देशातच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांना याची जाणीव करून देण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत. एड्ससारख्या जीवघेण्या आजाराने आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकीच एक आहे प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल जिया सारंगी. जिया सारंगीला मॉडेलिंगच्या जगाची राणी मानली जायचे. तिचा जन्म २९ जानेवारी, १९६० रोजी फिलाडेल्फिया येथे झाला होता. तिचे वडील एका रेस्टॉरंटचे मालक आणि आई गृहिणी होती. जेव्हा जिया ११ वर्षांची होती, तेव्हा तिचे आई- वडील एकमेकांपासून विभक्त झाले होते.
आई- वडिलांच्या घटस्फोटानंतर जिया तिच्या वडिलांसोबत राहू लागली. वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये ती त्यांना मदत करत असे. वयाच्या १६ व्या वर्षीच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. तेव्हा १९७६ च्या उन्हाळा चालू होता. त्यावेळी मॉडेलिंगचे जग सोनेरी रंगाच्या मॉडेलने भरलेले होते आणि जियाच्या रूपाने या उद्योगाला एक नवा चेहरा मिळाला.
जेव्हा जियाने मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हा ती खरोखरच एक नवीन चेहरा होती. तिने स्वत: ला मेकअप विना लोकांसमोर सादर केले होते. बघता बघताच ती अमेरिकेच्या सुपर मॉडेलपैकी एक बनली. प्रत्येकजण तिची एक झलक मिळण्याच्या प्रतीक्षेत असायचा. तिच्यासारखे बनण्याचे प्रत्येक मुलीचे स्वप्न असायचे.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी, जिया सारंगी सर्वाधिक मानधन घेणारी मॉडेल बनली होती. त्यावेळी तिची वार्षिक कमाई तब्बल दहा लाख डॉलर्स होती. म्हणूनच फॅशनच्या जगात लोक तिला जगातील पहिली ‘सुपर मॉडेल’ मानत असत.
सारंगी एक मोठ्या मनाची व्यक्ती होती. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे लोक तिच्याकडे आकर्षित झाले, पण तिच्या वागण्याने तिला कामापासून दूर नेण्यास सुरुवात केली. अगदी लहान वयातच तिला ड्रग्सची चटक लागली होती. हळूहळू तिच्या कारकीर्दीचा आलेख खाली येऊ लागला. १९८१ मध्ये ड्रग्ज घेऊन ड्रायव्हिंग केल्याच्या आरोपाखाली, तिला अटकही करण्यात आली होती.
सन १९८५ मध्ये न्यूमोनियामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा डॉक्टरांना तिच्या शरीरात एचआयव्हीचा विषाणू आढळला. त्यानंतर १८ नोव्हेंबर, १९८६ रोजी तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूची बातमी फॅशन जगात कोणापर्यंतच पोहोचली नव्हती. म्हणूनच तिचा कोणताच सहकारी तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हता. एकेकाळी मॉडेलिंगच्या जगावर राज्य करणार्या जियाचा असा मृत्यू होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. तिच्या आयुष्यावर एक चित्रपट देखील तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये एंजेलीना जोलीने तिची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…