Friday, July 5, 2024

ड्रग्ज प्रकरणी चर्चेत असलेल्या काॅमेडियन भारती सिंगबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीये का? एकेकाळी जेवणाचेही होते वांधे!

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अग्रगण्य विनोदी अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही नार्कोटिक्स च्या कारवाईमुळे चर्चेत आहेत. नुकताच महाअंतिम सोहळा साजरा करणाऱ्या इंडियाझ बेस्ट डान्सर या सोनी टीव्ही वरील कार्यक्रमाचे दोघेही निवेदक होते. परंतु आपल्याला ठाऊक आहे की आज भारती सिंग जे यश अनुभवत आहे ते मिळवण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले आहेत. एकेकाळी तिच्या दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत होती. चला तर मग आज भारती सिंगबद्दल अशाच अज्ञात गोष्टी जाणून घेऊयात.

१. भारती ही तिच्या आई वडिलांचं तिसरं अपत्य असून तिला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. ती पोटात असताना तिच्या आईने गर्भपात करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण म्हणतात ना देव तयारी त्याला कोण मारी आणि भारतीच्या बाबतीत अगदी हीच गोष्ट खरी ठरली.

२. भारती ही अवघी दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. आणि घराचा सारा भार हा तिच्या आईच्या खांद्यांवर येऊन पडला. या काळात अक्षरशः भारतीच्या कुटुंबाला दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. अनेक रात्री भारतीचे कुटुंब उपाशीपोटी झोपी जाई.

३. भारतीला लहानपणी अभिनयात काहीच रस नव्हता. शाळेत तिचं संपूर्ण लक्ष हे खेळांमध्ये असे. एक दिवस कॉलेजमधील नाट्यविभागाच्या शिक्षकांनी तिला एनसीसीच्या कॅम्प मध्ये हेरलं आणि काही वाक्य बोलायला सांगितली. आधी भारतीने साफ नकार दिला परंतु सरांनी सांगितल्याने तिने ती वाक्य वाचली आणि अशापद्धतीने तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. २५० रुपये प्रति प्रयोग या प्रमाणे भारतीने व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

४. भारती ही केवळ एक विनोदी अभिनेत्रीच नसून ती अभ्यासात देखील तितकीच हुशार होती. इतकी की तिने इतिहास या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. इतकंच नाही तर तिने शाळा आणि महाविद्यालयीन काळात तिरंदाजी आणि पिस्तुल शूटिंगच्या स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे.

५. भारतीने लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याच कार्यक्रमात तिची ओळख आता तिचा पती असलेल्या हर्ष लिंबाचियाशी झाली. योगायोग म्हणजे दोघांच्याही करियरमधील हा पदार्पणाचाच कार्यक्रम ठरला. आणि त्यातही हर्षनेच लिहिलेल्या स्क्रिप्टवर सादरीकरण करून भारती त्या कार्यक्रमातून बाहेर पडली. परंतु दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्यानंतर सुद्धा भारतीने तिच्या स्क्रिप्ट ह्या हर्षलाच लिहायला सांगितल्या. यानंतर भारतीने पुन्हा मागे वळून कधी पाहिलंच नाही.

६. २०१८ मध्ये भारती आणि हर्ष विवाहबद्ध झाले. घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रेमविवाह केला पण आपल्याला ठाऊक आहे का की, हर्ष हा भारतीपेक्षा वयाने खूप लहान आहे. त्या दोघांमध्ये तब्बल दहा वर्षांचं अंतर आहे.
आज भारतीला अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली, तरी तिने बॉलीवूड मधील हे यश अनुभवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत हे देखील तितकंच खरं आहे.

अशा अनोख्या गोष्टी आणि बातम्या वाचण्यासाठी आमच्या दैनिक बोंबाबोंब या संकेतस्थळाला आवर्जून भेट द्या.

हे देखील वाचा