टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ होय. हा शो मागील ५ वर्षांपासून आपल्या चाहत्यांना पोट धरून हसवत आहे. या शोप्रमाणे यातील कलाकारही प्रसिद्ध आहेत. यातीलच एक म्हणजे कपिल शर्मा होय. कपिलच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. कपिल या शोमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून तो या शोमधून पालकत्व रजेवर आहे. असे असले तरीही तो आता लवकरच पुनरागमन करणार आहे. अशातच आता वृत्त आहे की, त्याने या शोसाठी आपल्या मानधनात वाढ केली आहे. जिथे तो आधी लाखो रुपये घ्यायचा, तिथे आता तो कोट्यवधी रुपये घेणार असल्याचे म्हटले जात आहे. (Comedian Kapil Sharma Increased His Fees For The Kapil Sharma Show Now He Will Charged 1 Crore Per Week)
माध्यमांतील वृत्तानुसार, कपिलने आपल्या मानधनात १०- २० नाही, तर तब्बल ५० लाख रुपयांची वाढ केली आहे. कपिल आता एका आठवड्यासाठी १ कोटी रुपये मानधन घेणार आहे. यापूर्वी तो एका एपिसोडसाठी ३० लाख रुपये घेत होता. मात्र, आता त्याने आपल्या मानधनात प्रति एपिसोड ५० लाख रुपयांची वाढ केली आहे. एका आठवड्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच्या दोन एपिसोडसाठी आधी तो ६० लाख रुपये घेत होता, तर आता तो १ कोटी रुपये घेणार आहे. मात्र, अद्याप कपिलच्या मानधनाबाबत त्याच्याकडून आणि निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
कपिलचा शो टीआरपीच्या यादीत अधिकवेळा अव्वलस्थानी असतो. शोमध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार जसे की, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, दीपिका पदुकोण, करीना कपूर हजेरी लावत असतात.
अर्चना पूरन सिंग नसणार शोचा भाग?
नुकतेच असे वृत्त आले आहे की, आपल्या हसण्याने सर्वांचे मन जिंकणाऱ्या अर्चना पूरन सिंग यावेळी शोचा भाग नसतील. या वृत्तानंतर चाहत्यांना वाटले की, नवज्योत सिंग सिद्धू पुनरागमन करणार आहेत की काय. मात्र, या चर्चांवर अर्चना यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
अर्चना यांनी म्हटले की, “मला याबाबतीत कोणतीही माहिती नाही. आतापर्यंत मी या शोचा भाग आहे. तसंही जेव्हाही मी कोणताही प्रोजेक्ट साईन करते, तेव्हा अशा बातम्या येतात. यापूर्वी मी एका चित्रपटाची शूटिंग करत होते, तेव्हाही अशी बातमी आली होती आणि आता जेव्हा मी एका सीरिजची शूटिंग सुरू केली आहे, तर पुन्हा एकदा ही बातमी आली आहे.” पुढे बोलताना अर्चना यांनी आपल्याला या शोच्या प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाल्याचे म्हटले आहे.
या शोमध्ये कपिल शर्मा आणि अर्चना पूरन सिंगव्यतिरिक्त कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग आणि चंदन प्रभाकर हे कलाकार काम करतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू