Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड विवेक अग्निहोत्रींनी आई-वडिलांबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाले, ‘माझे आई-वडील गांधीवादी…’

विवेक अग्निहोत्रींनी आई-वडिलांबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाले, ‘माझे आई-वडील गांधीवादी…’

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट करोना महामारी, त्यावेळी देशात असलेली परिस्थिती, देशाने केलेला या भयंकर साथीचा सामना आणि भारतातील लसनिर्मितीची गोष्ट सांगणारा आहे. हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आई-वडिलांबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘द व्हॅक्सिन वॉर’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1 कोटी 30 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला आहे. गेले काही दिवस या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( vivek agnihotri ) या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. परदेशातही त्यांनी याचं खास स्क्रीनिंग आयोजित केलं होतं.

‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर यांच्याशिवाय अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, गिरीजा ओक आणि रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विवेक यांना त्यांच्या बालपणाबद्दल तसेच त्यांच्या आई वडिलांबद्दल विचारलं असता त्यांनी यावर उत्तर दिलं.अग्निहोत्री यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चेला तोंड फुटले आहे. काही लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे तर काही लोकांनी त्यांचं टीका केली आहे.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी ग्वालियरचा आहे. माझे आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. 17 व्या वर्षी माझ्या आईचं लग्न झालं व लगेचच 14 दिवसांतच ती तुरुंगवास भोगण्यासाठी वडिलांबरोबर गेली. वडील आधी दोनवेळा तरुंगांत गेले होते. कोणत्यातरी गांधीजी यांच्या स्कीममुळे सहा महिन्यांनी तुरुंगात ठेवलेल्या साऱ्या महिलांना सोडण्यात आलं.”

पुढे ते म्हणाले की, “माझे आई-वडील दोघेही गांधीवादी होते, खादी वापरायचे. जेव्हा इंदिरा गांधींनी आपातकालची घोषणा केली. तेव्हा मात्र माझ्या वडिलांनी गांधीवाद पूर्णपणे सोडला. ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने राहायचे. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते त्यामुळे त्यांनीच मला नाटकांमध्ये भाग घ्यायला लावलं.” त्याचे हे विधान सध्या चांंगलेत चर्चेत आले आहे. (Famous director vivek agnihotri says his parent was freedom fighter and follower of gandhiji)

आधिक वाचा-
हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’
‘प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत…’, संकर्षण कऱ्हाडेने प्रेक्षकांना केली विनंती, म्हणाला, ‘महाराष्ट्रात…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा