Sunday, December 8, 2024
Home अन्य ‘या’ प्रसिद्ध माजी मिस वर्ल्डचे निधन; वयाच्या 26व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जगभरातील चाहते शोकसागरात

‘या’ प्रसिद्ध माजी मिस वर्ल्डचे निधन; वयाच्या 26व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जगभरातील चाहते शोकसागरात

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीला एक ग्रहण लागल्यासारखे एक झाली की एक दु:खत बातमी समोर येत आहे. मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली. प्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र पिपट यांचे निधन झाले. ते मागील अनेक दिवसापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यापाठोपाठ आता प्रसिद्ध माजी मिस वर्ल्डचे देखील निधन झाले आहे.

माजी मिस वर्ल्ड शेरिका डी. अरमासचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले आहे. 2015मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेरिकाने अनेक वर्षांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा दिला. शेरिकाने केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचारही घेतले होते. शेरिका डी. अरमासच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिला ‘टॉप 30’मध्ये आपले स्थान टिकवता आले नाही. शेरिकाला नेहमीच मॉडल बनायचे होते.

शेरिकाच्या निधनानंतर अनेक स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. शेरिकाच्या निधनानंतर तिचा भाऊ मायाक डी. अरमासने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करीत त्याने लिहिले की, “तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील.” तसेच ‘मिस युनिव्हर्स’ उरुग्वे 2022 कार्ला रोमेरोने पोस्ट शेअर करीत शेरिकाला श्रद्धांजली वाहिली आहे.

शेरिका डी. अरमास यांचा जन्म 2007 साली उरुग्वेच्या मोंटेव्हिडेओ येथे झाला. त्यांनी 2015मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. स्पर्धेत त्यांनी ‘मिस कॉन्फिडन्स’ हा पुरस्कार जिंकला होता. शेरिकाने तिच्या कर्करोगाच्या लढाईतही कधीही हार मानली नाही. तिने तिच्या अनुभवावर आधारित अनेक मुलाखती आणि लेख लिहिले. तिने कर्करोगाशी लढणाऱ्या इतर लोकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. शेरिका डी. अरमासच्या निधनाने उरुग्वेच्या सौंदर्य आणि संस्कृतीला मोठा धक्का बसला आहे. ती एक प्रेरणादायी व्यक्ती होती आणि तिला नेहमी आठवणीत ठेवले जाईल. (Famous former Miss World Sherika D Armas died at the age of 26)

आधिक वाचा-
‘कुछ कुछ होता है’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला शाहरुख खानने घेतले नाही सलमानचे नाव, चाहत्याने विचारल्यास दिले मजेशीर उत्तर
जेव्हा करिश्माने मिनी स्कर्ट घालण्यास दिला होता नकार, तेव्हा दिग्दर्शकाने दाखवली होती लायकी, वाचा तो किस्सा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा