मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. तिच्या पोस्टवर चाहते प्रेमाच वर्षाव करत असतात. मुक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका प्रसिद्ध हॉटेलवर निशाणा साधला आहे. मुक्ता बर्वेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मुक्ताने (mukta barve) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका प्रसिद्ध हॉटेलच्या पोहेची प्रतिक्रिया दिली आहे. तिने पोस्ट करताना लिहिले की, “मी आज नाशिकला जाताना पडघा टोलनंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी, गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की, पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीशमध्ये कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं.”
मुक्ताच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि इतर सोशल मीडिया वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी मुक्ताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काही चाहत्यांनी मुक्ताला हॉटेलचा नाव घेऊन पोस्ट करण्याचे टोमणे मारले आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, “नाव मोठे लक्षण खोटे.” दुसऱ्याने लिहिले की, “पोहे बनवणाऱ्याला बहुतेक पगार वेळेत मीळत नसावा…”
View this post on Instagram
मुक्ता विषयी बोलायच झालं तर, मुक्ताने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या “पिंपळपान” या मालिकेतून केली. त्यानंतर तिने “बंधन”, “आभाळमाया”, “श्रीयुत गंगाधर टिपरे”, “इंद्रधनुष्य”, आणि “अग्निहोत्र” या मालिकांमध्ये काम केले. या सर्व मालिकांमध्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. 2010 मध्ये मुक्ताने “मुंबई-पुणे-मुंबई” या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिच्या अभिनयाने तिला चांगली ओळख मिळाली. त्यानंतर तिने “मंगलाष्टक वन्स मोअर”, “लग्न पहावे करून”, “डबलसीट”, आणि “हायवे- एक सेल्फी आरपार” या चित्रपटांमध्ये काम केले. या सर्व चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. (Famous Marathi actress mukta barve share post about poha dish and hotel on instagram)
आधिक वाचा-
–‘मी प्रेग्नंट…,’ अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने उघडे केले मोठे गुपित; म्हणाली, ‘मध्यंतरी एक…’
–‘चिंधी’चा ‘सिंधू’ होण्याचा प्रवास झाला सुरू; ‘ही’ अभिनेत्री साकारणार भुमिका? एकदा वाचाच