Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जरा इकडे पाहा! चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री उतरली ‘या’ व्यवसायात, जाणून घेतलंच पाहिजे

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आता स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तिची नणंद पल्लवी भिडेच्या साथीने प्रार्थनाने साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. ‘वी नारी’ (WeNaari) असं त्यांच्या नवीन ब्रँडचं नाव आहे. प्रार्थनाने इंस्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी प्रार्थनाने नव्या व्यवसायाची घोषणा करत तिच्या नव्या ब्रॅन्डविषयी प्रेक्षकांना माहिती दिली आहे.

“अनेक दिवसांपासून नवा ब्रँड सुरू करण्याची इच्छा होती अखेर आज घटस्थापनेच्या दिवशी आम्ही ‘वी नारी’ या आमच्या ब्रॅन्डची सेवा सुरू करत आहोत. मी आणि माझ्या नणंदेने मिळून हा ब्रँड सुरू केला आहे.” असं प्रार्थना इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं. प्रार्थनाने त्यांच्या पहिल्या साडीची झलकदेखील आज इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रोज नऊ रंगाच्या साड्या तुम्हाला मिळतील असंही अभिनेत्रीने सांगितलं.

प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले की, “हा साडीचा ब्रँड आहे का? मी उत्साहित आहे” तर काही नेटकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

प्रार्थना बेहेरेच्या नवीन व्यवसायाची सुरुवात उत्साहात झाली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या नवीन उपक्रमाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थनाच्या नवीन ब्रँडची उत्पादने लवकरच बाजारात उपलब्ध होतील. प्रार्थना बेहेरने 2018 मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

प्रार्थना विषयी बोलायचं झालं तर, प्रार्थना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिचा युटुब चॅनेल देखील चालू केला आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यामधील तिची भूमिका खूप गाजल्या आहेत. (Famous Marathi actress Prarthana Behere started a clothing business)

आधिक वाचा-
सव्वा लाख लोकांच्या गर्दीत हरवला उर्वशीचा आयफोन; ढसाढसा रडत थेट केली पोलिसात तक्रार, म्हणाली…
काजोल केशरी रंगाच्या साडीत दिसते प्रचंड सुंदर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा