Saturday, April 12, 2025
Home अन्य पॉपस्टार आर्यना सईदने सोडला अफगाणिस्तान, पोस्ट करत जो बायडन यांना म्हणाली, ‘मला विश्नास बसत नाहीये…’

पॉपस्टार आर्यना सईदने सोडला अफगाणिस्तान, पोस्ट करत जो बायडन यांना म्हणाली, ‘मला विश्नास बसत नाहीये…’

अफगाणिस्तानातील प्रसिद्ध पॉप स्टार आर्यना सईदने देश सोडला आहे. अफगाणिस्तान सोडलेल्या पॉप स्टार आर्यना सईदने इंस्टाग्रामवर अफगाणिस्तानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले की, “अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि यूएन मला विश्वास बसत नाही की, तुम्ही अफगाणिस्तानला अराजक स्थितीत सोडून गेला आहात. तसेच कृपया पाकिस्तानला निधी देणे बंद करा. ते त्याचा वापर अफगाणिस्तानात दहशतवादी पाठवण्यासाठी करतात.”

आर्यना सईदने काबूलहून अमेरिकेचे विमान पकडले आणि तालिबानच्या ताब्यात असलेला तिचा देश सोडला. तिने स्वतः देश सोडल्याची माहिती दिली आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात ती अमेरिकन कार्गो जेटमध्ये जाताना दिसत आहे. याशिवाय तिने आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यात ती मास्क घालून बसलेली दिसली. (Famous pop star Aryana Saeed left Afghanistan, posted a photo)

त्याचबरोबर तिने हे फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले आहे की, ‘काही न विसरण्यासारख्या आणि भीतीपूर्ण भरलेल्या रात्रीनंतर, अखेर मी जिवंत आणि निरोगी आहे. मी दोहाला पोहोचले आहे आणि आता इस्तांबूलला माझ्या फ्लाइटची वाट पाहत आहे.

विशेष म्हणजे तालिबानने काबूलवर ताबा मिळवला आहे. त्यांनी देशात शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून अफगाणिस्तानच्या उदारमतवादी आणि आधुनिकतावादी विभागात भीतीचे वातावरण आहे. लोकांना देश सोडून इतरत्र देशात स्थायिक व्हायचे आहे. तालिबानने विशेषतः महिलांवर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या अफगाणिस्तानची परिस्थितीत खूपच गंभीर झाली आहे. तेथील सर्व लोकांवर अत्याचार होत आहे आणि या अत्याचाराला कंटाळून अफगाणी लोक देश सोडून पळून जात आहेत. देशाचे सर्व अधिकार आता तालिबानच्या ताब्यात आल्याचे चित्र आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा