Saturday, July 6, 2024

खळबळजनक! ‘या’ प्रसिद्ध पंजाबी गायिकेला बिश्नोई गँगने दिली जीवे मारण्याची धमकी

पंजाब इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका जैस्मीन सैंडलसला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या शानदार अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी जैस्मीन सैंडलस आज केवळ पंजाबमध्येच नाही तर परदेशातही स्टेज शो करते. नुकतीच जैस्मीन सैंडलस सबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. गायकाला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या विषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.

झालं असं की, जैस्मीन सैंडलसचा (Jasmin Sandalus) लाइव्ह कॉन्सर्ट दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आला होता. या संदर्भात ती दिल्ली विमानतळावर पोहोचली. यादरम्यान जैस्मीन सैंडलससँडलसला धमकीचा कॉल आला होता, जो परदेशी नंबरवरून आला होता. या धमकीनंतर जैस्मीन सैंडलसची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे.

राहण्याची व्यवस्था दिल्लीतील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. तेथेही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे दिल्ली पोलीस लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आलेल्या कॉल्सची सतत चौकशी करत आहेत. मात्र, ही धमकी मिळाल्यानंतर जास्मिनच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये काही बदल झाला की नाही, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याच वेळी, गायकाचे चाहते तिचा आवाज ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

जैस्मीन सैंडलसने काही बॉलीवूड गाण्यांनाही तिचा आवाज दिला आहे. तिने सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील ‘यार ना मिले’ हे गाणे आणि वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘स्ट्रीट डान्स 3डी’ चित्रपटातील ‘इलेगल वेपन 2.0’ हे गाणे गायले आहे. गायिका जैस्मीनची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अहमदाबाद तुरुंगात आहे, त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे. लॉरेन्स सिंगर हा सिद्धू मूसवाला खून प्रकरणातही आरोपी आहे. (Famous Punjabi singer Jasmin Sandalus was threatened with death by Bishnoi gang)

आधिक वाचा-
अजय देवगणच्या ‘सिंघम ३’ मध्ये करीना कपूर असणार खास भूमिकेत, अभिनेत्रीने इंस्टग्रामवर दिली हिंट
‘गदर 2’ ची कहाणी ‘महाभारत’पासून प्रेरित आहे? उत्कर्ष शर्माने चित्रपटाबाबत केला खुलासा

हे देखील वाचा