Monday, July 8, 2024

रस्त्यावर रिक्षा चालवतोय पंजाबचा लोकप्रिय गायक, व्हिडिओ होतोय व्हायरल

पंजाबचा प्रसिध्द गायक ‘काका’ (Kaka) याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. २०१९ साली यूट्यूबवर रिलीज झालेलं त्याचं गानं, ‘सूरमा’ (Surma) याला लोकांनी खास पसंत केलं होतं. या गाण्याला लाखों व्यूज मिळाल्या आणि काका एका रात्रीत स्टार बनला. या गाण्यानंतर, काका सतत चर्चेत राहीला आहे. सध्या त्याचा एक जुना वीडियो व्हायरल होत आहे, ज्यात तो रिक्षा चालवताना दिसत आहे. या वीडियोवर त्याचे चाहते भरपूर लाइक आणि कमेंट करत आहेत.

काका या वीडियोमध्ये रिक्शा चालवताना, पंजाबी गानं म्हणताना ही दिसत आहे. आज काका त्याच्या कलेच्या जोरावर पंजाबच नाही, तर देशभरात प्रसिध्द आहे. त्याने लिबास (Libaas), तीजी सीट (Teeji Seat), धूर पेंडी(Dhoor Pendi), तेन्नू नी खबरां(Tennu ni Khabaran) अशा वेगवेगळ्या गाण्यांना आवाज दला होता. काका पंजाबी म्यूजिकमधील नवीन स्टार म्हणुन पुढे येत आहे. एका वर्षातच काकाची लोकप्रियता एवढी वाढली की त्याच्या प्रत्येक गाण्याला करोडो व्युज मिळु लागल्या. त्याचे चाहते, त्याच्या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत असतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kaka (@kaka._.ji)

 

काका ने कोणत्याही प्रोडक्शन कंपनीच्या मदती शिवायच हे सगळं मिळवलं आहे. त्याचे वडिल एक राजमिस्त्री म्हणून काम करायचे. बी.टेक केल्यानंतर काकाने पुर्णपणे आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रीत केलं. त्याने बऱ्याच गायन स्पर्धांमध्ये भाग घेतला. तो फक्त गानं म्हणतच नाही, तर लिहितो ही स्वतःच. २०२० मध्ये आलेलं त्याचं गानं ‘तीजी सीट’ यामधुन त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याने एकापेक्षा एक हीट गाणे देण्यास सुरूवात केली.

हे देखील वाचा