Tuesday, July 9, 2024

दुःखद! बिग बींच्या ‘बागबान’ चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटर शफीक अन्सारी यांचे निधन

बॉलिवूडच्या विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक शफिक अन्सारी यांचे बुधवारी (३ नोव्हेंबर) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांचा मुलगा मोहसीन अन्सारी याने वडिलांच्या दुःखद निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शफीक अन्सारी यांनी १९७४ साली पटकथा लेखक म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी ‘दोस्त’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा हे मुख्य कलाकार होते. यानंतर त्यांनी दिलीप कुमार, गोविंदा आणि माधुरी यांच्या प्रसिद्ध चित्रपट ‘इज्जतदार’ आणि नंतर १९९० मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या ‘दिल का हिरा’ या चित्रपटाचीही स्क्रिप्ट लिहिली. याशिवाय त्यांनी ‘प्यार हुआ चोरी चोरी’ या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी मिथुन आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री गौतमीसाठी स्क्रिप्ट रायटिंग केले होते. (famous screen writer shafeeq ansari of baghban fame passed away this morning)

नंतर आपल्या कारकिर्दीत, शफीक अन्सारी यांनी चित्रपट निर्माते बीआर चोप्रा यांच्यासोबत सहकार्य करून, २००३ मध्ये अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि सलमान खान अभिनीत ‘बागबान’ चित्रपटासाठी डायलॉग आणि स्क्रिप्ट लिहिल्या. हा चित्रपट वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

आता वयाच्या ८४ व्या वर्षी अन्सारी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अन्सारी यांच्या पश्चात मुलगा मोहसीन आणि मुलगी असा परिवार असून ते मुंबईतील अंधेरी भागात राहतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

-टेलिव्हिजनवरील ‘संस्कारी सून’ दिसली बोल्ड अवतारात, रश्मीचे बिकिनी फोटो पाहून कलाकारही म्हणतायत, ‘ओहो उफ्फ’

-शाहिदने बेडरूममधील फोटो केला शेअर, पाहून पत्नी मीरा म्हणाली, ‘तू स्वत:ला संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ…’

हे देखील वाचा