संगीत विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कंट्री गायक जेक फ्लिंट याचे रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) निधन झाले आहे. त्याने जोडीदारासोबत लग्न आणि सुखी आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, त्याची ही स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जेक फ्लिंट याचे लग्नाच्या काही तासांनंतर निधन झाले. तो फक्त 37 वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे प्रत्येकजण धक्क्यात आहे. त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची पत्नीही खचून गेली आहे.
‘मला ते कपडे निवडायचे आहेत, ज्यात पतीला दफन केले जाणार आहे’
जेक फ्लिंट (Jake Flint) याचे निधन झाल्यानंतर त्याची पत्नी ब्रेंडा (Jake Flint Wife post) हिने फेसबुक पोस्ट शेअर करत आपले दु:ख व्यक्त केले. ब्रेंडाने लिहिले की, “आम्ही आता लग्नाचे फोटो घेत असतो, हे व्हायला पाहिजे होते. मात्र, मला ते कपडे निवडायचे आहेत, ज्यामध्ये माझ्या पतीला दफन केले जाणार आहे. इतक्या वेदना मिळायला नको होत्या. माझे हृदय निघून गेले. त्याने परत यावे अशी माझी इच्छा आहे. मी आता आणखी सहन करू शकत नाही. मला त्याची गरज आहे.”
कशामुळे झाले निधन?
कुणालाच विश्वास बसत नाहीये की, ज्या जेक फ्लिंटचे काही तासांपूर्वी लग्न झाले होते आणि तो मस्ती करत होता, आता तोच या जगात नाहीये. गायकाच्या निधनाचे खरे कारण समजले नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, त्याचे निधन झोपेत असताना झाले आहे. असेही म्हटले जात आहे की, जेक फ्लिंटने ब्रेंडाशी शनिवारी (दि. 26 नोव्हेंबर) लग्न केले होते. तसेच, काही तासांनंतर त्याचे निधन झाले.
View this post on Instagram
सन 2016मध्ये आला होता जेक फ्लिंटचा पहिला अल्बम
जेक फ्लिंट याने खूप कमी काळात संगीत विश्वात पाऊल ठेवले होते. त्याने आपला पहिला म्युझिक अल्बम ‘I’m Not OK’ सन 2016मध्ये रिलीज केला होता. तसेच, त्याचा दुसरा अल्बम हा सन 2020मध्ये रिलीज झाला होता. मागील वर्षी 2021मध्ये जेक फ्लिंट याने लाईव्ह रेकॉर्डिंगची एक सीरिजही रिलीज केली होती. जेक फ्लिंट याच्या निधनानंतर त्याच्या मित्रमंडळींनी आणि कुटुंबातील व्यक्तींनी कठीण काळात निधी गोळा करण्यासाठी एक पेजही लाँच केले आहे. त्याच्या निधनावर चाहते शोक व्यक्त करत आहेत. (famous singer Jake Flint 37 dies unexpectedly just hours after his wedding)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
चाहत्यांना पुन्हा अनुभवता येणार विक्रम गोखलेंचा दमदार अभिनय, निधनानंतर झळकणार ‘या’ सिनेमात
धक्कादायक! मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करणाऱ्यांवर भडकला अभिनेता; म्हणाला, ‘मी इंडस्ट्री सोडतो…’