Friday, July 5, 2024

नवं पर्व सुरू! प्रसिद्ध गायिका वैशाली माडेंचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

बॉलिवूड आणि राजकारण यांचं फार जुनं नातं आहे. अनेक अभिनेते- अभिनेत्री, गायक, दिग्दर्शक यांनी आपले नशीब राजकारणात आजमावलं आहे. यामध्ये आता आणखी एका गायिकेच्या नावाचा समावेश झाला आहे. ही गायिका इतर कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका वैशाली माडे आहे. त्यांचं नवं पर्व सुरू झालं असून गुरुवारी (३ मे) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होते.

याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये फोटोही दिसत आहे. ज्यात अजित पवार, वैशाली माडे, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे हे दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोरोना नियमांचे पालन करत मास्कही घातल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे, वैशाली माडे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

वैशाली यांनी ‘पिंगा’, ‘फितूरी’, ‘ये ना गडे’, ‘प्रियकरा’, ‘दिलबरा’ यांसारखी अनेक हिंदी आणि मराठी गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा