Saturday, June 29, 2024

स्टाईल- स्मार्टनेसच्या बाबतीत ‘या’ गायिका टॉप अभिनेत्रींनाही देतात टक्कर, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

जेव्हा चाहत्यांसमोर हॉटनेस किंवा बोल्डनेसची चर्चा होते, तेव्हा त्यांच्या मनात प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांसारख्या टॉप अभिनेत्रींची नावे येतात. यांसारख्या अभिनेत्रींनी आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना वेड लावले आहे. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. जे पाहून चाहते स्वतः ला त्यांच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाही. पण आज आम्‍ही तुम्‍हाला बॉलिवूडच्‍या टॉप फिमेल सिंगरची ओळख करून देत आहोत, ज्या बोल्डनेसच्‍या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत.

नेहा कक्कर (Neha Kakkar)
गायिका नेहा कक्करला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती आज बॉलिवूडचा एक चमकता चेहरा बनली आहे. तिने तिच्या आजावाची जादू सर्वांवरच चालवली आहे. मात्र नेहा कक्कर केवळ तिच्या आवाजासाठीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय नाही, तर ती तिच्या स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध आहे. नेहा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या एकापेक्षा एक जबरदस्त लूकने ती चाहत्यांना घायाळ करते.

कनिका कपूर (Kanika Kapoor)
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे ‘चिट्टियाँ कलाईयां’ हे गाणे तर तुमच्या लक्षात असेलच. अभिनेत्रीने यात तिची जबरदस्त स्टाईल दाखवली होती. मात्र हे गाणे गाणारी गायिका कनिका कपूर देखील एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कनिका कपूर प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे स्वतःला स्टायलिश अंदाजात तयार करून तिचे फोटो शेअर करत असते. ज्यामुळे अनेकदा ती चर्चेचा विषय बनत असते.

नेहा भसीन (Neha Bhasin)
नेहा भसीन ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तसेच ती ‘बिग बॉस’साठीही ओळखली जाते. नेहा तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते. त्याचबरोबर नेहा भसीन प्रचंड हॉट आहे. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सोना मोहपात्रा (Sona Mohapatra)
‘अंबर सारिया’ फेम गायिका सोना मोहपात्रा खूप सुंदर गाते. ती खऱ्या आयुष्यातही तितकीच हुशार आहे. सोना मोहपात्रा ग्लॅमरच्या बाबतीतही मागे नाही.

तुलसी कुमार (Tulsi Kumar)
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक असलेले ‘साकी साकी’ गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यात नोरा तर सुंदर दिसतच होती, मात्र हे गाणे गाणारी गायिका देखील खूप सुंदर आहे. ‘साकी साकी’ सारखी हिट गाणी देणारी तुलसी कुमार खऱ्या आयुष्यात खूप हॉट आहे.

नीती मोहन (Neeti Mohan)

 

अलीकडेच आई झालेली नीती मोहन खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि स्मार्ट आहे. ज्यामुळे ती तिच्या चाहत्यांमध्ये सतत चर्चेचा विषय बनत असते.

हेही वाचा

हेही पाहा-

हे देखील वाचा