Saturday, July 6, 2024

दुःखद! रंगभूमीवरील दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या ‘या’ कलाकाराने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. हिंदी रंगभूमीवरील आणि सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि नाटककार मोहन महर्षी यांचे दुःखद निधन झाले आहे. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे माजी हेड असलेल्या मोहन महर्षी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मोहन महर्षी यांच्या निधनाची माहिती अभिनेते पंकज झा कश्यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. ९ मे रोजी मोहन यांचे निधन झाले आहे. मनोरंजनविश्वात त्यांनी जवळपास सहा दशकं काम केले. खासकरून त्यांनी रंगभूमीवर अधिक काळ गाजवला. अतिशय प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जायचे, त्यांच्या निधनामुळे मोठी क्षति झाल्याची भावना सर्वांमध्ये आहे.

Mohan Maharishi, a theatre director, actor and a playwright, at Chandigarh. Tribune photo-211093-Yog Joy

मोहन महर्षी यांनी १९५५ साली ऑल इंडिया रेडिओपासून त्यांच्या करियरची सुरुवात केली. १९६५ साली त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयांमधून डिप्लोमा केला आणि १९८३ ते १९८६ या दरम्यान राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे निर्देशक म्हणून त्यांनी काम केले. १९९२ साली मोहन यांना नाटक अकॅडमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

मोहन महर्षी यांना त्यांच्या क्रांतिकारी नाटकांसाठी ओळखले जायचे. ज्यात ‘आईस्टाइन’, ‘राजा की रसोई’, विद्योत्तमा, सापशिडी आदी अनेक नाटकांचा समावेश होता. यासोबतच त्यांनी अंधयुग, रानी जिंदन (पंजाबी), ओथेलो, मदर आदींचे देखील दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोजमध्ये देखील काम केले. यात त्यांनी मुस्लिम समाजसुधारक असलेल्या सैयद अहमद खान ही भूमिका साकारली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट
राखी सावंत पुन्हा संकटात, ड्रामा क्वीनला पुन्हा माराव्या लागणार कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा

हे देखील वाचा