Wednesday, July 3, 2024

पडद्यावर आपल्या अभिनयाची दहशत निर्माण करणारे बॉलिवूड खलनायक, कट्टर फॅन असाल तर दाखवा ओळखून

चित्रपट जगतात अनेक नायक होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर कायमचे राज्य केले. मात्र, यामध्ये असे काही खलनायकही होते, ज्यांनी पडद्यावर अत्यंत क्रुरता दाखवूनही प्रचंड प्रेम करणारा चाहतावर्ग कमावला होता. सध्या एक फोटो व्हायरल होतोय, त्यातील खलनायकांना ओळखळे जरा कठीणच आहे. चला पाहूया कोण आहेत ते खलनायक.

हिंदी चित्रपटसृष्टीने मोठ्या पडद्यावर नायकाच्या भूमिका करणारे अनेक सुपरस्टार दिले, त्याचबरोबर अनेक दिग्गज कलाकार होते, जे लोकांमध्ये भीती आणि द्वेष निर्माण करून यशस्वी खलनायक ठरले. आपल्या असामान्य अभिनयाच्या बळावर या कलाकारांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली होती. ज्यांची सिनेसृष्टीत आजही चर्चा केली जाते. यामध्ये दोन कलाकार आहेत, ज्यांना बॉलीवूडचा जीव आणि प्राण म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या काळातील आणखी एक महान खलनायक म्हणजे मदन पुरी. १९७०-८० च्या दशकातील या कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर हा काळ चांगलाच गाजवला होता.

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

या तीनही खलनायकांमध्ये तुमचा आवडता खलनायक कोण? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना विचारण्यात आला होता. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्राण (Pran), जीवन (Jeevan) आणि मदन पुरी (Madan Puri) एकत्र दिसत आहेत. हा फोटो शेअर करून लोकांकडून त्यांचे आवडते खलनायक कोण आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेगवेगळ्या भूमिकांसाठी चाहते या तिघांचेही कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी एका चाहत्याने “‘राम और श्याम’ मधील प्राण आणि ‘अमर अकबर अँथनी’मधील जीवन यांच्या भूमिका सर्वोत्तम आहेत, दोघेही प्रतिभावान कलाकार आहेत,” असे सांगितले आहे. मात्र, जास्तीत जास्त लोक प्राण साहेबांना आपला आवडता खलनायक असल्याचे सांगत आहेत.

प्रत्यक्षात मात्र प्राण जेव्हा हिंदी चित्रपटात आले, तेव्हा त्यांना नायक बनायचे होते. मात्र, त्यांनी खलनायक म्हणूनच सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या भूमिकेत असलेला जिवंतपणा आणि हावभाव चाहत्यांना नेहमीच आवडायचे. प्राण यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ३५० हून अधिक चित्रपटात काम केले. ज्यामध्ये ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘शहीद’, ‘उपकार’, ‘डॉन’, ‘पूरब और पश्चिम’, ‘राम और श्याम’, ‘जंजीर’, ‘अमर अकबर अँथनी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.

हिंदी चित्रपटांतील खलनायकांना प्राण यांनी वेगळी ओळख दिली, असे म्हणले जाते. त्यांची संवाद शैली अत्यंत दर्जेदार होती. म्हणूनच ते अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या खलनायकांपैकी एक आहेत. पडद्यावर सर्वांना मारणारे प्राण साहेब खऱ्या आयुष्यात अत्यंत शांत स्वभावाचे होते, आणि हीच त्यांच्या अभिनयाची मोठी जादू होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा