तुम्हा सर्वाना राष्ट्रीय पुरस्कार विजेता फॅन्ड्रीमधला ‘जब्या’ आठवतच असेल. जब्याने म्हणजेच सोमनाथ अवघडेने ‘फॅन्ड्री’ सिनेमातून त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याने त्याच्या पहिल्याच सिनेमात जबरदस्त अभिनय करत राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. मात्र त्या सिनेमानंतर सोमनाथ जणू गायबच झाला होता. परंतु हाच सोमनाथ पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमनाथचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
आगामी ‘फ्री हिट दणका’या मराठी चित्रपटात सोमनाथ पुन्हा एकदा फॅन्सला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका आणि त्याचा हटके लुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या ‘फ्री हिट दणका’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सोमनाथच्या हातात दिसत असलेली बॅट आणि त्याचा शर्ट पॅन्टमधला स्मार्ट लुक साहजिकच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.
सोमनाथचा पहिला सिनेमा फॅन्ड्री पाहून चक्क मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याचे कौतुक करत त्याची भेट देखील घेतली होती. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना सोमनाथच्या अभिनयाची भुरळ पडली होती. सुरुवातीला अभिनय करण्यास नकार देणाऱ्या सोमनाथने त्याच्या पहिल्याच सिनेमातून तो किती ताकदीचा अभिनेता आहे हे दाखवून दिले आहे.
दरम्यान, ‘फ्री हिट दणका’ हा सिनेमा येत्या १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथ अवघडेसोबत अभिनेत्री अपूर्वा एस. ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची हिट जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केले असून, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.
हेही वाचा-
–काय सांगता!! आपल्या रिंकूला डोळ्यांनी देखील ऐकू येतं? विश्वास नाही ना बसत, मग वाचा ही बातमी
–अरेव्वा! रिंकूचे फॅट टू फिट असे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पाहा तिचे नवीन फोटो
–क्या बात! रिंकूची हिंदी सिनेसृष्टीत होणार दमदार एन्ट्री, या चित्रपटातून करणार पदार्पण
–सर्वांचा लाडका आकाश ठोसर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, त्याचा नवीन दमदार लुक ठरतोय चर्चेचा विषय