Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडच्या ‘या’ लोकप्रिय जोड्यांच्या लग्नाची वाट बघत आहेत फॅन्स

बॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशल आणि कॅटरीनाच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार ते दोघे डिसेंबर महिन्यात लग्न करू शकतात. असे म्हटले जात आहे की ते दोघे राजस्थानमधील सवाई मधेपूर येथील सेन्सस फोर्ट बरवारा या रिसॉर्टमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र ही बातमी खरी आहे की नाही, याबद्दल अजूनही साशंकता आहे. परंतु दोघेही या बातम्यांना खोटे सांगत त्यांच्या लग्नाची तयारी गुपचूप करत असल्याचे बोलले जात आहे. या जोडप्यासोबतच चाहत्यांना बॉलिवूडमधील अजून अनेक जोड्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. पाहूया अशाच काही जोड्यांची नावे.

रणबीर कपूर-आलिया भट्ट
रणबीर आणि आलियाची लव्ह स्टोरी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. सेटवर दोघे अनेकदा एकमेकांसोबत हातात हात घालून बसल्याचे दिसायचे. या दोघांचे लग्न पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. रणबीर एका मुलाखतीत म्हणाला होता की, जर कोरोना सारखी महामारी आली नसती तर, त्यांनी दोघांनी लग्न केले असते. त्या दोघांच्या लग्नाबद्दल असे बोलले जात आहे की, ते डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. मात्र, याबद्दल अजून कोणतीच पक्की माहिती समोर आली नाहीये.

मलायका अरोरा-अर्जुन कपूर
अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडले गेले. काही काळानंतर दोघांनीही जगासमोर आपले नाते स्वीकारले. या दोघांचे लग्न पाहण्यासाठी त्यांचे चाहते अधिक उत्सुक आहेत. याआधी अशी बातमी आली होती की हे जोडपे २०१९ मध्येच लग्न करणार आहे पण तसे झाले नाही. परंतु आता हे जोडपे लग्न करतात की नाही हे पाहावे लागेल.

पत्रलेखा- राजकुमार राव
राजकुमार राव हा बॉलीवूडमधील एक प्रभावी अभिनेता आहे. राजकुमार गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत सक्रीय आहे आणि आपल्या दमदार अभिनयाने त्याने सगळ्यांनाच त्याचे चाहते बनवले आहे. त्याचे नाव इतर अभिनेत्रींसोबत कधीच जोडले गेले नाही. पत्रलेखा आणि राजकुमार २०१० मध्ये प्रेमात पडले आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. चाहते या दोघांच्या लग्नाची वाट आतुरतेने पाहत आहेत आणि दोघेही त्याच्या चाहत्यांना लवकरच लग्नाची गूड न्युज देऊ शकतात.

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी

‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या दोघांना अनेकवेळा लंच डेटवर एकत्र पाहिले गेले. तसेच ती सिद्धार्थच्या आईला देखील भेटली आहे. अशा परिस्थितीत ते दोघेही लवकरच लग्न करू शकतात अशा चर्चा आहेत. कियारा एकदा मुलाखतीमध्ये म्हणाली होती की, ती बॉयफ्रेंडबद्दल बोलणार नाही तर थेट लग्नच करेल.

सुष्मिता सेन-रोहमन शॉल
सुष्मिता सेन सध्या चित्रपटांपासून दूर जरी असली तरी अनेकदा ती विविध कारणांमुळे चर्चेत येत असते. सुष्मिता मॉडल रोहमन शॉलला डेट करत आहे. ती लग्न करणार असल्याची बातमी खूप दिवसापूर्वी आली होती. त्याचबरोबर चाहतेही सुष्मिताच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हे जोडपे गुड न्यूज कधी देतात हे बघावे लागेल.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा