‘फुलपाखरू’ मालिकेत काम करून अभिनेत्री ऋता दुर्गुळे घरघरात पोहचली. अगदी कमी कालावधीत ती महाराष्ट्राची ‘क्रश’ बनली आहे, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही. या दिवसांत ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे निरागसतेने भरलेले फोटो नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडतात. आता अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नुकताच ऋताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिची अप्रतिम सुंदरता पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या व्हिडिओमधील ऋताचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भुरळ पाडायला पुरेसा आहे. या तुम्ही पाहू शकता की, बॅकग्राऊंडमध्ये ‘ओम शांती ओम’ची म्युझिक वाजत आहे आणि ऋता त्या धूनवर तिच्या अदा दाखवत आहे.
ऋताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. शिवाय तिने अलीकडेच तिचे काही फोटो पोस्ट केले होते, ज्यात ती पांढऱ्या आऊटफिटमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे तिच्या हा फोटोंनाही चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. ऋता सतत तिचे वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. (fans go crazy on hruta durgules latest video see here)
ऋताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. ती ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शोमध्ये झळकली आहे. शिवाय तिने ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे आता अभिनेत्री रवी जाधवच्या ‘टाईमपास ३’ मध्ये झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-