Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या चाहतीने फोडला हंबरडा; रडत रडत म्हणाली, ‘सिडनाझ नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहतील…’

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाझ गिल यांची जोडी टीव्हीच्या प्रसिद्ध जोडींपैकी एक होती. ‘सिडनाझ’ #SidNaaz दररोज सोशल मीडियावर ट्रेंड करत असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, त्याच्या एका चाहतीची अवस्था खूप वाईट आहे.

ती रडत रडत लोकांना सांगत आहे की, “‘सिडनाझ’ संपली नाही, ती आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील. तुम्ही कृपया ‘सिडनाझ’ संपले असे म्हणणे थांबवा. आम्ही त्यांना कायम आमच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवू.”

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला आतापर्यंत १२ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ हजारांहून अधिक कमेंट्सही करण्यात आल्या आहेत.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल ही जोडी ‘बिग बॉस १३’ पासून सुपरहिट ठरली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ‘बिग बॉस १३’ नंतरही त्यांना एकत्र पाहणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. सिद्धार्थ आणि शहनाझ अलीकडेच डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने ३’ आणि ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये विशेष पाहुणे म्हणून हजर झाले होते. शहनाझ सिद्धार्थसोबत ‘डान्स दीवाने ३’ च्या सेटवर शेवटची दिसली होते. दोघांनीही तेथील चाहत्यांची मने जिंकली होती. या शोमध्ये या दोघांची केमेस्ट्री खूपच छान दिसत होती.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. साल २००८ मध्ये सिद्धार्थने पहिली टीव्ही मालिका ‘बाबुल का आंगन छूटे ना’ मधून पदार्पण केले होते. परंतु २०१३ मध्ये ‘बालिका वधू’या मालिकेतून त्याने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. यानंतर तो २०१४ मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ या वेबसीरिजमुळेही सिद्धार्थ बराच चर्चेत आला होता. सिद्धार्थ हा ‘खतरों के खिलाडी ७’ आणि ‘बिग बॉस १३’ चा विजेता होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

हे देखील वाचा