Monday, March 9, 2026
Home साऊथ सिनेमा ज्युनियर एनटीआर रुग्णालयात धावले, सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली प्रंचड गर्दी, तर पोलिसांना करावा लागला लाठीमार

ज्युनियर एनटीआर रुग्णालयात धावले, सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली प्रंचड गर्दी, तर पोलिसांना करावा लागला लाठीमार

ज्युनियर एनटीआर हा साउथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय स्टार आहे. तू नेहमीच त्याच्या चित्रपट संबंधी चर्चेत असतो,  जेव्हा जेव्हा त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्याला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळला आहे. तर तो नुकतच केआयएमएस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी बेंगळुरूमध्ये पोहोचला होता. तिथे सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी  त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. 8 मार्च रोजी महादेवपुरा येथे झालेल्या कार्यक्रमात सुपरस्टारला पाहण्यासाठी सुरक्षा व्यवस्था असुनही चाहत्यांनी रुग्णालयाच्या एस्केलेटरचे नुकसान केले. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला.

ज्युनियर एनटीआर (NTR)रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी बेंगळुरूमध्ये पोहोचताच, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा मेळाच जमला. अभिनेत्याने त्याच्या कारच्या छतावर उभे राहून त्याच्या चाहत्यांचे स्वागत केले. यानंतर, अभिनेत्याच्या चाहत्यांचा उत्साह वाढला, सुपरस्टारला जवळून पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते रुग्णालयाच्या आत गर्दी करू लागले. घोषणाबाजी करत होते ते सेल्फीसाठी धडपड करत होते. चाहते बॅरिकेड्स तोडून लॉबीमध्ये घुसले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही कार्यक्रमस्थळी पोहोचले.

त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत, ज्युनियर एनटीआरचा एक चाहता एस्केलेटरवरून पडला. प्रचंड गर्दीमुळे रुग्णालयातील एस्केलेटरचे मोठे नुकसान झाले. स्वागत क्षेत्रातील फर्निचरचेही नुकसान झाले. परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. पोलिसांनी सुरक्षा घेराव तयार केला. तर सुपरस्टारला कार्यक्रमस्थळी सुरक्षितपणे पोहोचवले. हा व्हिडिओ एक्स वर व्हायरल होताच वाद निर्माण झाला. अनेकांनी चाहत्यांच्या या उन्मादाला चुकीचे आणि भयानक म्हटले. असे अनेक प्रतिक्रिया आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

कार अपघातानंतर अनुराग डोभाल यांचा रुग्णालयातून व्हिडिओ समोर, त्यांची पत्नीही त्याला पहायला पोहोचली रुग्णालयात

हे देखील वाचा