अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तुफान’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. मृणालने या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका पाहून प्रेक्षक आणि समीक्षक चांगलेच प्रभावित झाले आहेत. तर दुसरीकडे मृणालने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोने सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
मृणाल ठाकूरने काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर ‘तुफान’ आणले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या फोटोमध्ये तिने जमिनीवर बसून पोझ देत फोटोशूट केले आहे. तिने केस मोकळे सोडले असून, पाठीवर सोडले आहेत. मृणालने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘स्टाईलिंग’.
मृणालचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत, तर काही कलाकार देखील यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता अरिजित तनेजाने ‘दफूक’ लिहून प्रतिक्रिया दिली आहे., तर किश्वर मर्चंटने ‘सिझलिंग’ असे लिहीले आहे. तसेच सुरभी ज्योतीने ‘ओह बॉय’ लिहिले आहे. त्याचबरोबर या ब्लॅक एँड व्हाईट क्लोजअप फोटोमध्ये मृणाल ठाकूरचे अप्रतिम सौंदर्य दिसत आहे. चाहत्यांसह तिचे बॉलिवूडमधील मित्र देखील तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
जवळपास एक आठवड्यापूर्वी मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर बॉडीसूटमध्ये तिचा बोल्ड फोटो शेअर केला होता आणि सांगितले होते की, तिने पहिल्यांदाच असा आऊटफिट परिधान केला आहे. यासोबतच तिने ‘सेल्फ लव्ह’चा धडाही शिकवला. अभिनेत्री मृणाल ठाकूरने टीव्ही अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली होती. टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’ मुळे तिला नवीन ओळख मिळाली. मृणालने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मृणालने बॉलिवूडमध्ये हृतिक रोशनसोबत ‘सुपर ३०’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. फरहान अख्तरच्या ‘तुफान’नंतर ती लवकरच शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ या आगामी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. सध्या मृणाल ठाकूर ‘आंख मिचोली’ चित्रपटात काम करत आहे. या व्यतिरिक्त, एक तेलुगू चित्रपटसुद्धा लाइनमध्ये आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर