Saturday, July 6, 2024

आयपीएल आधी ‘कॅप्टन कूल’ने केला रॉकस्टार लूक चाहते; म्हणाले, नको रे राहू ‘या’ अभिनेत्यासोबत

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच आपल्या सर्वांना क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा खेळताना दिसणार आहे. निमित्त आहे आयपीएल सामन्यांचे. १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने सुरू होणार आहेत. या सामन्यांच्या आधीच सर्वांचा आवडता धोनी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीची प्रत्येक गोष्ट नेहमीच याच्या फॅन्ससाठी खूपच महत्वाची असते. तो नेहमी त्याच्या हटके गोष्टींमधून फॅन्सला आनंद देऊन जातो.

आज जरी धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याच्या लोकप्रियेत यत्किंचितही फरक पडलेला नाही. आता अचानक धोनीचा विषय निघाला म्हटल्यावर कारणही तसेच असणार ना. तर सध्या आपल्या सर्वांचा कॅप्टन कुल धोनी त्याच्या नवीन आणि हटके अशा हेअरस्टाईलमुळे प्रकाशझोतात आला आहे. धोनीने अलीकडेच एका जाहिरात शूटसाठी त्याची नवीन हेअरस्टाईल केली असून, त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

स्टार स्पोर्ट्स आयपीएल २०२१ च्या ब्रॉडकास्ट वाहिनीने धोनीचे या नव्या अवतारातील फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये धोनीचे केस रंगीबेरंगी दिसत असून त्याने स्टार्स असलेले जॅकेट घातले आहे. त्याच्या कॅप्टन कुल नावाला साजेसा असा रॉकस्टार लूक त्याचा या फोटोमध्ये दिसत आहे. खरं तर हा एका जाहिरातीचे फोटो असून, ज्यावर लिहिले आहे की, ‘पिक्चर अजून बाकी आहे.’ तसे पहिले तर हा फोटो कमी आणि पोस्टर्स जास्त वाटत आहे. पण धोनीचा हा लूक त्याच्या काही चाहत्यांना आवडलेला दिसत नाही. तशा कमेंट्स देखील धोनीला मिळत आहे.

धोनीचा हा लूक पाहून काही चाहत्यांनी त्याला अभिनेता रणवीर सिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीने मुंबईत एक फुटबॉल सामना खेळताना दिसला होता. या सामन्यात रणवीर सिंह देखील सहभागी झाला होता. याच दरम्यान धोनीने मुंबईत ही जाहिरात शूट केली आणि टीम इंडियाच्या नवीन रेट्रो जर्सीमध्ये दिसला.

धोनी अनेकदा त्याच्या शूटच्या निमित्ताने वेगवेगळे लूक तरी करत असतो. आता धोनी आयपीएल २०२१च्या नवीन जाहिरातीमध्ये रंगीत केसांच्या लूक मध्ये दिसत आहे. यापूर्वी त्याने एका जाहिरातीसाठी चक्क टक्कल देखील केले होते. या जाहिरातीमध्ये त्याने एका संन्यासीचे रुप धारण केले होते. ज्यात तो इतर संघांच्या खेळाडूंबद्दल बोलताना दिसला.

आयपीएल संघ असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने दुबईमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. आयपीएल २०२१ चे एकूण २९ सामने या अगोदर खेळवण्यात आले होते. हा आयपीएलचा ३० वा सामना आहे. जो १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा