फराह खान (Farah Khan) ही हिंदी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाते. अनेक गाजलेल्या गाण्यांमध्ये फराहने आपल्या नृत्य दिग्दर्शनाची छाप पाडली आहे. फराह खान तिच्या कोरिओग्राफीप्रमाणेच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. ज्यामधून ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या फराहचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे ज्यामध्ये ती अभिनेते अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) डान्स करताना दिसत आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडिओ चला जाणून घेऊ.
सध्या सोशल मीडियावर फराह खानचा एक व्हडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोरिओग्राफर-फिल्ममेकर फराह खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अभिनेता अनिल कपूरसोबत शाहिद कपूरच्या ‘गंदी बात’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसतेय. फराह-अनिल कपूरचा हा व्हिडिओ ‘उमंग मुंबई पोलिस शो 2022’ मधील आहे. जिथे फराह आणि अनिल कपूर ब्लॅक आउटफिटमध्ये उपस्थित होते.
हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत फराह खानने अनिल कपूरला टॅग केले आहे. त्यासोबत फराहने एका जबरदस्त कॅप्शनसह ते शेअर केले आहे. ज्यामध्ये फराहने “ ही पार्टी नेहमीच असते, जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीतील सर्वात तरुण व्यक्ती अनिल कपूरला भेटता आय लव्ह यू पाजी म्हणत” अनिल कपूरचे कौतुक केले आहे. अभिनेते अनिल कपूरने फराहचा हा व्हिडिओ त्याची इंस्टाग्राम स्टोरी म्हणून ठेवला आहे. यासोबतच त्याने स्वतःचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो खरोखर तरुण आणि देखणा दिसत आहे. अनिल कपूर एकीकडे आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकत आहेत, तर दुसरीकडे अनिल कपूरचा लूकही चाहत्यांना आवडला आहे. वयाच्या 65 व्या वर्षीही ते इतके तरुण कसे दिसतात याचे अनेकवेळा चाहत्यांना आश्चर्य वाटते.
View this post on Instagram
दरम्यान अनिल कपूर सध्या त्याच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 24 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. बातम्यांनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी 28 लाखांचा व्यवसाय केला होता. त्याचवेळी, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 12 कोटी 25 लाखांचा व्यवसाय केला आहे. अनिलने ‘जुग जुग जिओ’मध्ये उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.