Saturday, June 29, 2024

पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

फराह खान (Farah Khan) ही हिंदी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाते. फराहने हिंदी सिने जगतातील अनेक गाण्यांना आपल्या दमदार कोरिओग्राफीने लोकप्रिय केले होते. फराह खान तिच्या कोरिओग्राफीसाठी तर प्रसिद्ध आहेच त्याच बरोबर ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच फराह  खानने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल एक महत्वाचा खुलासा फराहने केला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

कोरिओग्राफर फराह खान नेहमीच अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी घेत असते. फराह खानने अलीकडेच एका टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये मिका सिंग त्याच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहे. शूटिंग दरम्यान, कोरिओ फराह खानने  तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितले. शिरीष कुंदरसोबतच्या तिच्या लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांची आठवण करून देताना ती म्हणाली की तो काळ खूप कठीण होता. यावेळी फराहने अनेक खुलासे केले.

आपल्या लग्नाबद्दल बोलताना  फराहने सांगितले की “मला वाटतं लग्न करण्यासाठी कोणतेही निश्चित वयोमर्यादा नाही, जेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती सापडेल तेव्हा तुम्ही लग्न केले पाहिजे. लग्नाच्या पहिल्या वर्षी मला पळून जायचे होते कारण ते जुळवणे खूप कठीण आहे.” फराह आणि शिरीष कुंदरने डिसेंबर 2004 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2008 मध्ये अन्या, दिवा आणि जार या तिन मुलांचे त्यांनी   स्वागत केले. अलीकडेच फराहने तीस मार खान या तिसर्‍या दिग्दर्शनाच्या अपयशाबद्दल उघडपणे मत व्यक्त केले होते. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “तीस मार खानने मला कसे तोडले हे मला अजूनही आठवते आणि लोकांनी याबद्दल बरेच काही सांगितले पण चित्रपटाने पैसेही कमावले.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

 

आपल्या संघर्षाबद्दल बोलताना फहारने सांगितले की ती एक लढाऊ आणि जिद्दी स्त्री आहे. तीस मार खान फ्लॉप झाल्यानंतर तिला घराबाहेर पडायचे नव्हते. पण या अडचणीतून वेळीच बाहेर पडण्यासाठी त्यांच्या सासूबाईंनी त्यांना खूप मदत केली होती. मला जरी शीला की जवानीच्या कोरिओग्राफीसाठी पुरस्कार मिळाला होता. माझ्या सासूबाईंनी मला त्यासाठी जाण्यास प्रोत्साहन दिले.(farah khan revealed about her marriage said i wanted to run away in the first year of marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव

माेठा खुलासा! बिग बाॅसच्या घरात शालीन अन् टीना करत हाेते बाळाचे प्लॅनिंग?

हे देखील वाचा