Saturday, July 6, 2024

महाराष्ट्राच्या राजकारणावर फराह खानची प्रतिक्रिया म्हणाली, ‘आमच्या मताला काही महत्वच नाही’

महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच आहे. एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसोबत गुवाहाटीत तळ ठोकून असल्याने आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. या सर्व गदारोळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडले आहे. याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचवेळी प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आणि बॉलीवूड अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खानने (farah khan) ट्विट करून राजकारणातील मत आणि पक्षांतराबद्दल माहिती दिली आहे. या ट्विटवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

फराह खानने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, “मला राजकारण समजत नाही, पण जेव्हा लोक एखाद्या व्यक्तीची निवड करतात तेव्हा ती व्यक्ती कोणाचे प्रतिनिधित्व करते. जर त्या व्यक्तीने जिंकून तो पक्ष सोडला तर तो लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे कारण तो विशिष्ट पक्ष आणि विचारसरणीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून आला होता. म्हणजे आमच्या मताला काही अर्थ नाही.”

महाराष्ट्राच्या संकटाबद्दल बोलायचे झाले तर ‘शिंदे’ टीममध्ये शिवसेनेचे ३९ आमदार आहेत. पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रतेचा सामना न करता पक्ष तोडण्यासाठी शिंदे यांना शिवसेनेच्या ३७आमदारांची गरज होती. बुधवारी रात्री तीन अपक्ष आणि एक शिवसेना आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले होते. अशा स्थितीत त्यांच्यासोबत केवळ ३१ आमदार उरले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा