Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करताना फरहान अख्तरकडून झाली मोठी चूक, ट्रोलर्सने साधला निशाणा

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करताना फरहान अख्तरकडून झाली मोठी चूक, ट्रोलर्सने साधला निशाणा

आजचा दिवस भारतीय हॉकीच्या इतिहासातला खूपच महत्वाचा आणि सुवर्णाक्षरात लिहिण्याजोगा ठरला. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीला ५-४ असे हरवत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. पुरुष संघाच्या या आभाळाएवढ्या मोठ्या कामगिरीसाठी संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील संघाचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

या सर्वांमधे अभिनेता फरहान अख्तर मात्र चांगलाच ट्रोल होत आहे. फरहानने भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर विजयी पुरुष संघाऐवजी महिला संघाचेच अभिनंदन केले आहे. फरहानने संघाचे अभिनंदन करत असताना केलेल्या ट्वीटमध्ये ‘गो गर्ल्स’ अशी सुरुवात करत, अभिनंदनपर ट्वीट केले. मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्याने हे ट्वीट लगेच डिलीट केले. पण तरीही त्याच्या या चुकीच्या ट्वीटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

फरहानने त्याच्या चुकून केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “गो गर्ल्स! टीम इंडियाचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. त्यांनी जबरदस्त फायटिंग स्पिरीट दाखवत चौथे मेडल आपल्या नावावर केले… सुपर… टोकिओ २०२० हॉकी…” त्याच्या या ‘गो गर्ल्स’ लिहिण्यावरून त्याला ट्रोल केले जात आहे. मात्र विचार करण्याची गोष्ट म्हणजे, फरहानच्या चुकीच्या ट्वीटला काही महाशयांनी लाइक देखील केले. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो, ज्यांनी त्याचे ट्वीट लाइक केले त्यांना देखील ही चूक समजू नये. असे ट्वीट देखील काही लोकांनी केले आहे.

त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी त्याला ट्रोल करत काही ट्वीट केले आहे.

त्याने त्याचे चुकीचे ट्विट डिलीट केल्यानंतर पुन्हा एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने लिहिले, “भारतीय संघाने दाखवलेल्या लढवय्या वृत्तीचा फार अभिमान वाटत आहे. आपल्याला चौथे पदक जिंकून दिले आहे. मस्त कामगिरी.”

हे देखील वाचा