मागील दोन वर्षांपासून बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर हा त्याचा आगामी चित्रपट ‘तुफान’ची तयारी करत आहे. या चित्रपटातील जबरदस्त कंटेंटमुळे चित्रपटाची सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात फरहान अख्तरनचा एका गुंडापासून ते एका बॉक्सरपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. या चित्रपटात त्याने अजीज अलीचे पात्र निभावले आहे. फरहान अख्तरने सांगितले की, ही भूमिका निभावताना आमिर खानच्या ‘रंगीला’ चित्रपटातील त्याच्या मुन्ना या पात्राची आठवण अली. तो म्हणाला की, या चित्रपटात बॉक्सरची भूमिका निभावून त्याला खूप आनंद झाला. (Farhan Akhtar said I am very happy to play boxer character in toofan movie)
आमिर खानने फरहान अख्तर याने दिग्दर्शन केलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात 20 वर्षापूर्वी काम केले होते. फरहानने सांगितले की, तो नेहमीच असा विचार करायचा की, सुपरस्टारला असे पात्र निभावताना किती मजा येत असेल, ज्यात कोणाचीही पर्वा न करता जगायचे असते.
फरहान अख्तरने एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “मला अजीज अली सारखे बिनधास्त पात्र निभावताना खूप मजा आली. मी जेव्हा ‘रंगीला’ मध्ये आमिर खानला पाहिले, तेव्हा मी विचार केला होता की, अशी पात्र निभावताना किती मजा येत असेल ना!! हे सगळं मला या चित्रपटात करायला भेटले यामुळे मी खूप आनंदी आहे.”
https://www.instagram.com/p/CMO0fiMhhA0/?utm_source=ig_web_copy_link
‘तुफान’ हा चित्रपट 16 जुलै, 2021 रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये डोंगरी भागातील अजीज अली उर्फ अज्जू भाई नावाच्या एका गुंडाची खेळावरील प्रेरणादायी कहाणी दाखवली आहे. ही कहाणी अजीज अलीच्या बॉक्सिंगवर आधारित आहे.
दक्षिण मुंबई येथे चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओम प्रसाद मेहरा यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा अंजुम राजाबालो आणि विजय मौर्य यांनी लिहिली आहे. फरहान अख्तरने या चित्रपटातील हे पात्र निभावताना केलेल्या मदतीचे श्रेय सह कलाकार हुसेन दलालला दिले आहे. जो नागपाडामध्येच राहतो. तसेच त्याने तेथील रहिवासींचे देखील आभार मानले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी