Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड फरहान शिबानी होणार आई बाबा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा

फरहान शिबानी होणार आई बाबा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित लग्नांपैकी एक म्हणजे शिबानी दांडेकर (Shibani Dandekar)आणि फरहान अख्तरचं (Farhan Aktar)लग्न. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे बॉलिवूडमधील प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहे. लग्नापासून फरहान आणि शिबानी दोघेही खूप चर्चेत असतात. १९ फेब्रुवारी रोजी खंडाळ्यातील शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर हा लग्न समारंभ दणक्यात पार पडला. नुकताचं या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यानंतर चाहत्यांनी शिबानीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर हे काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियात आले आहेत. फरहान आणि शिबानी आपल्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. फोटो पोस्ट करताना फरहानने कॅप्शनमध्ये ‘थ्री ऑफ अस’ असे लिहले आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. येथून या कपलने इन्स्टाग्रामवर नुकताचं एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

 फोटोमध्ये फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या चेहऱ्यावर दिसणार अ‍ॅटिट्यूड चाहत्यांना खूप आवडतो. त्यामुळेच हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागला आहे.

अशी होती फरहान अख्तरची लव्ह स्टोरी
४८ वर्षीय फरहान अख्तरने ४१ वर्षीय गर्लफ्रेंड शिबानीशी लग्न केलं. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करायचे. फरहान शिबानीला २०१५ मध्ये एका शोमध्ये भेटला होता. त्या दोघांनी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. फरहान अख्तरचं हे दुसरे लग्न आहे. याआधी २००० मध्ये त्याने ब्रिटिश इंग्लिश हेअरस्टायलिस्ट अधुना भबानीसोबत लग्न केले. मात्र परस्पर संमतीने दोघांनी १७ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. फरहान आणि अधुना यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. त्यांना दोन मुली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘वडापाव कोणेकाळी आधार होता’, अमोल कोल्हेंना आठवला संघर्षाचा काळ
‘या’ दाक्षिणात्य कलाकारांनी लग्नात ओतला पाण्यासारखा पैसा, पण संसार काही टिकला नाही
बॉयकॉट करुनही सुपरहिट! आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाची परदेशात छप्परफाड कमाई

हे देखील वाचा