माणूस हा अतिशय हुशार प्राणी आहे. हुशारी दाखवण्यासाठी शिक्षणाचीच गरज असते किंवा शिकलेलाच हुशारी दाखवू शकतो, असा काहीही कुठेही नियम नाही. लोकं त्यांच्या डोक्याचा वापर कुठे कुठे आणि कसा करतात याचे एक उत्तम उदाहरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सामान्य लोकं कलाकारांच्या फोटोंचा, त्यांच्या नावाचा काय आणि कसा वापर करून घेतील याचा काहीच नेम नसतो. आज आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते वाचून नक्कीच तुम्हाला हसायला येईल.
कलाकारांचे जेव्हा कोणतेही पोस्टर किंवा फोटो छापला जातो, तेव्हा त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र एका शेतकऱ्याने अभिनेत्रीच्या पोस्टरचा जो जसा उपयोग केला आहे, ते पाहून तुम्हाला तुमचे हसू थांबवता येणार नाही. आंध्रप्रदेशमधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये त्याच्या पिकाच्या सुरक्षेसाठी चक्क सनी लियोनीचे बिकिनी पोस्टर लावले आहे. (farmer planted bikini poster of sunny leone)
आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील बांदा किंदा पाले गावात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या ए चिंचु रेड्डी एका शेतकऱ्याने त्याच्या भाज्यांच्या पिकासाठी या पिकाच्या रक्षणासाठी लाल बिकीनीतील सनीचे पोस्टर लावले आहे. अमेरिकेच्या माजी प्रसिद्ध पॉर्नस्टार असलेल्या सनीचे रेड्डी हे खूप मोठे फॅन आहेत, त्यांनी त्यांच्या गावातील लोकांच्या चुकीच्या दृष्टीपासून पिकाला वाचवण्यासाठी ही नामी शक्कल लढवली आहे.
एका रिपोर्टनुसार रेड्डी यांनी त्यांच्या १० एकरवर पसरलेल्या पिकांसमोर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सनीचे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर तेलगूमध्ये ओरे नानू छोसी इडावाकुरा अर्थात माझ्यावर जळू नका असे लिहिले आहे. या शेतकऱ्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. कारण त्याच्या शेतावरून जाणारे सर्व लोकं या पोस्टरकडे एकटक लावून बघतात.

सनीबद्दल सांगायचे झाल्यास ती सर्वप्रथम बिग बॉसमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने पूजा भट्टच्या जिस्म सिनेमातून अभिनयाला प्रारंभ केला. आज सनी अनेक चित्रपटांसोबतच आयटम सॉंग करताना देखील दिसते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?
-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप
-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी