Friday, April 18, 2025
Home वेबसिरीज शाहिद कपूरच्या आयुष्यातील नवीन फेज ‘फर्जी’चा टिझर प्रदर्शित, यावर्षी करणार ओटीटी पदार्पण

शाहिद कपूरच्या आयुष्यातील नवीन फेज ‘फर्जी’चा टिझर प्रदर्शित, यावर्षी करणार ओटीटी पदार्पण

सध्या ओटीटी या माध्यमाला अतिशय चांगले दिवस आले आहेत. या माध्यमाची उपलब्धता, माध्यमांवरील कन्टेन्ट आणि लोकांचे ओटीटीला मिळणारे प्रेम पाहून बॉलिवूडमधील मोठं मोठे कलाकार आता ओटीटीवर येण्यासाठी उत्सुक आहेत. २०२३ या नवीन वर्षात अनेक मोठे स्टार ओटीटीवर पदार्पण करणार आहे. याच कलाकारांमधील एक नाव म्हणजे शाहिद कपूर. शाहिदने आतापर्यंत मोठ्या पडद्यावर रोमॅटिकपासून ऍक्शन, थ्रिलर जवळपास सर्वच प्रकारच्या भूमिका करून प्रेक्षकांना खुश केले आहे. आता शाहिद ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. फॅन्स देखील त्याला ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

‘फर्जी’ या वेबसिरीजच्या माध्यमातून तो ओटीटीवर पदार्पण करत आहे. नुकताच या सिरीजचा एक उत्कंठावर्धक टिझर समोर आला आहे. हा टिझर शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये शाहिद कपूरचा एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना दिसत आहे. या टीझरमध्ये शाहिद कॅनव्हासवर काहीतरी पेंट करताना दिसत आहे. यावरून तो या सिरीजमध्ये पेंटरची भूमिका साकारणार यात शंका नाही. यात तो म्हणतो, “माझ्या आयुष्यातील नवीन फेज लोकांना आवडेल का? मात्र कलाकार तर कलाकार असतो. नाही का?” अमेझॉन प्राइमने देखील हा टिझर शेअर केला आहे. हा टिझर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “नवीन वर्ष नवीन माल.”

‘फर्जी’ या सिरिजचे दिग्दर्शन फॅमिली मॅन सिरिजचे दिग्दर्शक असलेल्या राज अँड डिके यांनी केले आहे. शाहिद कपूरने या सिरीजच्या निमित्ताने नवीन वर्षात त्याच्या फॅन्सला एक मस्त भेट दिली आहे. हा टिझर समोर आल्यानंतर त्याच्यावर नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक मस्त कमेंट्स करत शाहिदचे कौतुक केले असून, त्याचे या माध्यमात स्वागतही केले आहे. या टिझरने आता सिरिजबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढवली आहे. मात्र अजून ही सिरीज कधी प्रदर्शित होणार आणि यात कोणकोणते कलाकार असणार याबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरी फेब्रुवारी मार्चमध्ये सीरिज येण्याची अपेक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता, ‘दीपिका माझ्यासाठी दाल चावलसारखी होती…’
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

हे देखील वाचा