Wednesday, July 3, 2024

मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन

ब्रिटिश फॅशन इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश फॅशन डिझायनर डेम मेरी क्वांट यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. ही वाईट बातमी त्यांच्या परिवारानेच सर्वांना दिली. डेम मेरी क्वांट या ६० च्या दशकात एक ट्रेंडसेंटर डिझायनर होत्या. त्यांनी मिनीस्कर्ट, हॉट पॅन्ट आदी अनेक ड्रेसचा अविष्कार केला. त्यांच्या निधनामुळे जगभरातील फॅशन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर ब्रिटिश फॅशन जगच नाही तर इतरही देशातील फॅशन विश्वात काम करणाऱ्या लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डेम मेरी क्वांट यांच्या परिवाराने त्यांच्या निधनाचे वृत्त खरे असल्याचे सांगत म्हटले की, “डेम मेरी क्वांट यांनी आज सकाळी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांच्या इंग्लडमधील घरी अखेरचा श्वास घेतला. त्या २० व्या दशकातील सर्वात जास्त प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फॅशन डिझायनर्स पैकी एक होत्या. त्यांना त्यांच्या मिनी स्कर्टच्या अविष्कारासाठी सर्वात जास्त ओळखले जाते.”

ब्लॅकचेथ लंडनमध्ये जन्मलेल्या डेम मेरी क्वांट या फॅशन जगतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होत्या. १९५० साली गोल्डस्मिथ कॉलेजमधून त्यांनी इलस्ट्रेशंसचा अभ्यास केला. नंतर त्यांनी फॅशन डिझायनिंगकडे त्यांचा मोर्चा वळवला. १९५५ साली लंडनच्या किंग रोडवर त्यांनी त्यांचे पहिले स्टोर सुरु केले. डेम मेरी क्वांट मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट डिझाइन करण्यासाठी ओळखले जाते.

डेम मेरी क्वांटने त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. १९६३ साली डेम मेरी क्वांट यांना इनॉगरल ड्रेस ऑफ द ईयर अवॉर्ड देण्यात आला. त्यानंतर १९६६ साली त्यांना फॅशन जगातील योगदानासाठी ओबीई अवॉर्ड दिला गेला. हेरियट-वाट यूनिवर्सिटीने त्यांना २००६ साली डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित केले गेले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

हे देखील वाचा