‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात पहिल्या आठवड्यातील पहिल्या साप्ताहिक कार्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा महिला विशेष असल्याने महिला घरातील वेगवेगळ्या भागाच्या मालकीण आहेत, तर पुरुष हे त्यांचे सेवक आहेत. या आठवड्यात बिग बॉसने सदस्यांवर ‘चिऊताई चिऊताई दार उघडं’ हे कार्य सोपवले होते. यात पुरुषांना महिलांना प्रभावित करण्यासाठी काही कार्य करायचे असते. प्रत्येक कार्यात महिलांना दोन पुरुषांना निवडायचे असते आणि मग त्या दोघांमध्ये पुढचे कार्य होणार असते.
यावेळी बिग बॉसने एक फॅशन शो करण्यास सांगितले. या आधीच महिलांनी सर्वानुमताने विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे या दोघांची निवड केली. यासाठी विकास आणि उत्कर्ष यांना दोन महिलांच्या मदतीने स्त्री वेश धारण करायचा होता, तर मदत केलेल्या महिलेला पुरुषाचा वेश धारण करायचा होता. तसेच त्या दोघांना मिळून एक डान्स परफॉर्मन्स देखील करायचा होता. यावेळी उत्कर्ष याने डान्ससाठी सुरेखा यांची निवड केली, तर विकास याने मीनलची निवड केली. (Fashion show arrange in bigg Boss house as a task, this contestent are involve in task)
यावेळी दोघेही खूप सुंदर दिसत होते. उत्कर्षने नऊवारी साडी परिधान केली होती, तर सुरेखा यांनी कोळी वेश केला होता. विशालने देखील नऊवारी साडी नेसली होती.
उत्कर्ष आणि सुरेखा यांनी ‘ही पोली साजूक तुपातली’ या गाण्यावर डान्स केला, तर विशाल आणि मीनलने ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर डान्स केला. याव्यतिरिक्त संतोष चौधरी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
https://www.facebook.com/140231176680/posts/10158021220911681/
महिलांनी बहुमताने या टास्कमध्ये उत्कर्ष याला विजयी केले. तसेच या आठवड्यात दोन पॉईंट मिळून उत्कर्ष याला ‘चिऊ ताई चिऊ ताई दार उघड’ या टास्कचा विजेता घोषित केले. यासोबत बिग बॉस यांनी उत्कर्षला त्याच्यासोबत एका महिला सदस्याला सहविजेती म्हणून घोषित करण्याचा खास अधिकार दिला, तेव्हा त्याने मीरा हिची सहविजेती म्हणून निवड केली. या दोघांमध्ये आता पुढच्या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी टास्क होणार आहे. या दरम्यान उत्कर्ष आणि विशालने खास उखाणे देखील घेतले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू
-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी