टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी शोपैकी एक असलेला ‘खतरों के खिलाडी’ हा शो पुन्हा परतला आहे. या शोचा १२वा सिझन चांगलाच चर्चेत आहे. या शोची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, निर्मातेही या शोमधील स्पर्धकांचे नवनवीन प्रोमो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहेत. अशातच निर्मात्यांनी एका स्पर्धकाचा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून अभिनेत्रीचे चाहत्यांचा जीवही बुचकळ्यात पडला आहे.
जन्नत झुबेर हिचा खतरनाक स्टंट
ही अभिनेत्री इतर कुणी नसून टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबेर (Jannat Zubair) ही आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान ती बेशुद्ध होते. त्यानंतर तिला पाण्यातून बाहेर काढले जाते. जन्नतच्या या प्रोमो व्हिडिओने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. तसेच, व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर तिचे चाहते तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
प्रोमोमध्ये जन्नत पाण्याच्या खाली स्टंट करताना दिसत आहे. ती पाण्यात उडी मारते आणि जसा हा प्रोमो संपणार असतो, तेव्हा स्टाफ तिला पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहेत. यादरम्यान जन्नतची स्थिती खूपच खराब असल्याचे दिसते. मात्र, ती रोहित शेट्टी याने दिलेला स्टंट पूर्ण करू शकली की नाही, हे शो टेलिकास्ट झाल्यानंतरच समजेल. शो टेलिकास्ट होण्यास अजूनही पाच दिवसांचा कालावधी बाकी आहे.
View this post on Instagram
खरं तर जन्नत झुबेर ही ‘खतरों के खिलाडी १२’ (Khatron Ke Khiladi 12) या रियॅलिटी शोमधील सर्वात युवा स्पर्धक आहे. ती या शोमधील प्रत्येक टास्क पूर्ण समर्पकतेने पूर्ण करत आहे. या शोमध्ये यंदा रुबीना दिलैक, शिवांगी जोशी, राजीव अदातिया, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, फैसू, कनिका मान, चेतना पांडे, तुषार कालिया, जन्नत झुबेर आणि श्रीति झा यांच्यासोबत अनेक कलाकारांनी एंट्री घेतली आहे. आता हा शो टेलिकास्ट झाल्यानंतर कोण किती पाण्यात होतं हे समजेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-