अमिताभ बच्चन हे एक ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकर्दीमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. तसेच आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. तर आता ते 83 वर्षांचे आहेत. तसेच ते सध्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. तर नुकतेच त्यांनी त्यांच्या ब्लॉग मधून त्यांच्या चाहत्यांना सांगितले की, त्यांना काम करायला इतके का आवडते , घरी बसून कंटाळा का येतो, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. यावरुन असे दिसुन येते की, कामाबाबत एक विलक्षण ओढ आहे, आणि त्याना आजही त्यांना काम करायला आवडते आहे.
अमिताभ बच्चन (Bachchan)यांनी त्याच्या नवीन ब्लॉगद्वारे पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्याने नुकतेच आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल, दिनचर्येबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. ते म्हणाले कामाशिवाय एक दिवसही त्यांना अस्वस्थ करतो. त्यांनी लिहिले, आळसाचा दिवस. काही विशेष कारण नाही. फक्त रोज काम न केल्याने मला अस्वस्थ वाटते.
त्यांनी पुढे लिहिले, “आजचा दिवस नेहमीप्रमाणे का जात नाहीये, याचे आश्चर्य वाटते. दिनचर्या विस्कळीत झाली आहे… ती सुधारण्याची गरज आहे. आणि काम केल्याने बरे वाटते. बिग बी अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती 17’ चे सूत्रसंचालन करताना दिसले, ज्यामुळे या शोसोबतच्या त्यांच्या दीर्घ प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. कामाच्या आघाडीवर, अमिताभ बच्चन शेवटचे नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
परिणीती चोप्राने सुरु केला नवीन टॉक शो; पती राघव चड्ढाने दिल्या शुभेच्छा










