Sunday, August 3, 2025
Home अन्य महिलेने गायक राहुल जैनवर केले गंभीर आरोप, दोनवेळा गर्भपात करायला लाऊन झालाय फरार

महिलेने गायक राहुल जैनवर केले गंभीर आरोप, दोनवेळा गर्भपात करायला लाऊन झालाय फरार

एका महिला गीतकार आणि लेखिकेने गायक आणि संगीतकार राहुल जैनविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या महिलेने असा आरोप केला आहे की, राहुल जैन स्वतःचे मूल नाकारत आहे आणि ते मूल कोणाला तरी दत्तक द्यावे अशी त्याची इच्छा आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, महिलेचे वकील चंद्रकांत अंबानी यांनी सांगितले की, राहुल जैनच्या विरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचा असा आरोप आहे की, राहुलने तिला त्याच्या कारकिर्दीचा हवाला देत दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर तिने कोणालाही त्यांच्या नात्याबद्दल आणि मुलाबद्दल सांगू नये अशी त्याची इच्छा होती. महिलेच्या वकिलांनी या प्रकरणावर सांगितले की, मुलाच्या वडिलांचे नाव जन्माच्या प्रमाणपत्रावर नमूद केले आहे. परंतु त्याचे नाव त्या मुलाला देण्याऐवजी, त्याने आई आणि मूल दोघांनाही सोडून दिले आणि स्वतः गायब झाला आहे.

राहुल जैनने तिला तिसऱ्यांदा गर्भपात करण्यास पाडले भाग
वकील चंद्रकांत यांनी असेही उघड केले की, तिसऱ्यांदा आरोपीने महिलेला गर्भपात करण्यास सांगितले होते. परंतु यावेळी महिलेने त्याचे ऐकले नाही. वकिलांनी सांगितले की, यावेळी गर्भपात करण्यासाठी तिची वैद्यकीय स्थिती चांगली नव्हती. पण तरीही राहुल तिला पुन्हा पुन्हा गर्भपात करण्यास भाग पाडत होता. तिने यावेळी तिच्या मुलाला जन्म दिला, जो आता सहा महिन्यांचा आहे.

एवढेच नाही, तर राहुल जैनवर महिलेच्या बचतीचा खर्च केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राहुल जैनने आपली सर्व रिसॉर्सेज वापरली आणि त्यांना त्रास दिला, असे वकिलांनी सांगितले आहे. राहुलने तिची गाणी वापरली, ती त्याच्या नावाने म्युझिक कंपनीला विकली आणि त्यांच्याकडून मिळालेले पैसे त्या महिलेला दिले नाहीत.

स्वतःवरील या गंभीर आरोपांच्या दरम्यान, राहुल जैनने धिंडोसी न्यायालयात अंतरिम जामीन याचिका दाखल केली, त्यावर सोमवारी सुनावणी झाली आहे. या महिलेच्या वकिलाने सांगितले की, आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. परंतु सध्या या प्रकरणाची सुनावणी आता २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. महिलेने ६ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रेड स्वीमिंग सूटमध्ये कमाल दिसतेय रकुल प्रीत, पूलमध्ये पाहायला मिळाला बोल्ड अंदाज

-…म्हणून राहुल वैद्यला येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवक्त्याने उघड केलं कारण

-समुद्रकिनारी पत्नी अंकितासोबत एन्जॉय करताना दिसले मिलिंद सोमण, व्हायरल होतोय रोमॅंन्टिक व्हिडिओ

हे देखील वाचा