नुकतीच फेमिना मिस इंडिया २०२३ ही स्पर्धा संपन्न झाली. मणिपूरमध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने बाजी मारत २०२३ सालच्या सौंदर्यवतीचा मुकुट पटकावला आहे. नंदिनी गुप्ताने तिच्या आत्मविश्वासाने आणि सौंदर्याने या खिताब पटकावला आहे. तर दिल्लीच्या श्रेया पुंजा हिने दुसरा आणि मणिपूरची थोनावजाम स्ट्रेला लुआंगने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
काळ्या रंगाच्या गाऊनमधे रॅम्प वॉक करताना नंदिनी खूपच सुंदर दिसत होती. १९ वर्षाच्या नंदिनीने ‘मिस इंडिया’हा किताब जिंकल्यानंतर आता ती मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंटमध्ये भारताला रिप्रेझेन्ट करणार आहे. मिस इंडिया झालेल्या नंदिनी गुप्ताबद्दल जाणून घेऊया अधिक माहिती.
View this post on Instagram
नंदिनी गुप्ता राजस्थानच्या कोटा येथील राहणारी असून, तिने तिचे शिक्षण तिथेच घेतले आहे. तिने बिजनेस मॅनेजमेंटची पदवी संपादन केली आहे. लहानपणापासून तिने मिस इंडिया होण्याचे स्वप्न पहिले होते. आज तिचे स्वप्न पूर्ण झाले. तिने ‘फेमिना मिस इंडिया राजस्थान’ चा मुकुट देखील तिने पटकावला आहे. केवळ १९ व्या वर्षी एवढी मोठी स्पर्धा जिंकणारी नंदिनी सगळ्यांसाठी प्रेरणा बनली आहे. आता तिला आंतरराष्ट्रीय स्तवरावर जिंकताना पाहण्याची लोकांची इच्छा आहे.
यावर्षीची ‘फेमिना मिस इंडिया’ ही स्पर्धा मणिपूर्ण येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सर लैश्राम सरीता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिझायनर्स रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केले तर या कार्यक्रमात मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले. शिवाय या सोहळ्यात याआधी मिस इंडियाच्या विजेत्या ठरलेल्या सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मानसा वाराणसी, मान्या सिंग, सुमन राव, शिवानी जाधव यांनी दमदार परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी देखील परफॉर्म केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी