Sunday, July 14, 2024

FIFA विश्वचषक कतार २०२२, ‘हय्या हय्या’ थीम सॉंग झाले रिलीज

सध्या देशभरातील फुटबॉल रसिकांना FIFA विश्वचषक 2022 ची जोरदार उत्सुकता लागली आहे. जगभरातील फुटबॉल संघ दाखल होणार्‍या या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्याच्या तयारी सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळेच या विश्वचषकाचे सर्वांनाच जोरदार आकर्षण राहिले असून या स्पर्धेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. याचवेळी आता या स्पर्धेचे थीम सॉंग लाँच झाले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की FIFA विश्वचषक 2022 च्या ड्रॉसाठी सध्या जगभरातील चाहते उत्सुक आहेत. या स्पर्धेचे आयोजन यंदा कतारमध्ये करण्यात आले आहे. यापुर्वी या स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले असून अजून चार जागा शिल्लक आहेत. त्यामुळेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. या स्पर्धेचे सौंदर्य आणि चर्चा आणखी वाढवण्यासाठी FIFA विश्वचषक कतार 2022 चे अधिकृत थीम सॉंग लाँच झाले आहे. हय्या हय्या या गाण्यात त्रिनिदाद, कार्डोना, डेव्हिडा आणि आयशा यांचा समावेश आहे. आता हे गाणे जगभर हीट होईल यात काही शंका नाही.

दरम्यान FIFA विश्वचषक 2022 साठी आतापर्यंत एकूण 29 संघ पात्र ठरले आहेत, कतारला यजमान म्हणून स्वयंचलित पात्रता मिळाली आहे. पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील हा या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला संघ होता, तर कतारमध्ये आपले स्थान निश्चित करणारा जर्मनी हा पहिला युरोपियन राष्ट्र होता. 2002 मध्ये शेवटचा फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलने CONMEBOL च्या पात्रता स्पर्धेत प्रगती केली, ज्यामध्ये एकूण नऊ संघांचा समावेश होता. सेल्काओने आतापर्यंत प्रत्येक विश्वचषकात भाग घेतला आहे. यावर्षी कोपा अमेरिका जिंकणारा लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघही विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा