मनोरंजन विश्वामधील मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील 2022 या वर्षी अनेक कलाकारांनी आपल्या नात्याला लग्न बंधनात अडकवले. आलिया भट्ट-रणबीर कपूर, तर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी सारख्या गाणाऱ्या मालिकेच्य जोप्यांनी देखिल आपल्या नात्याला नाव दिलं आहे. अशातच टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री हंसी परमार हिने देखिल गुपचुप पद्धातीने आपला लग्नसोहळा उरकला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री हंसी परमार (Hansi Parmar) हिने नुकतंच तिचा बॉयफ्रेंड आकाश श्रीवस्तव (Akash Shrivastav) याच्याशी लग्न केलं आहे. हंसी गेल्या अनेक दिवसांपासून मुबई मध्ये राहात होती मात्र, तिने तिच्या आयुष्याचा जीवनसाथी ग्वालियरमध्ये राहाणारा निवडला. अभिनेत्रीची लव्हस्टोरी देखिल चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
हंसीने एक मुलाखतीदरम्यान तिच्या कारिअरबद्दल सांगितले होते की, ‘ती जेव्हा गुरजरातवरुन महाराष्ट्रात अभिनय क्षेत्रामध्ये करिअर बनवण्यासाठी तिची कठीण यात्रा सुरु झाली होती. त्यावेळी ती राहाण्यासठी घर शोधत होती, तिने जिथे घर शोधले होते त्याच बिल्डींगमध्ये आकाशही राहात होता. याच ठिकाणी त्यांची भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाची कथा सुरु झाली आणि आता आयुष्यभरासाठी त्यांनी एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला.’

मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या हंसीने ग्वालीयरणची सून म्हणून एका प्रश्नावर हंसी परमार म्हणाली की, ‘मी गुजरातची राहणारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझं करिअर घडलं आणि आता ती ग्वालियरची सून झाली आहे.यामुळे मला देशातील वेग-वेगळी संस्कृती शिकायाला मिळल्या तिने सांगितले की, ती कधीच ग्वालियरला गेली नाही मात्र, अता ती ग्वालियरची सुन झाल्यामुळे खूपच खुश आहे.’
हंसीचा पती आकाश परमार याच्या मते त्याच्या विचार होता की ‘त्याचं लग्न फिल्मी स्टाइलने व्हावा आणि शेवटी ती वेळ आली आणि एक अभिनेत्रीच त्याची पत्नी बनली. हंसीने ‘बालिका वधू‘, ‘गीत हुई सबसे पराई‘, काली एक अग्नि परीक्षा’ सारख्य अनेक गाजणाऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे त्याशिवाय बॉलिवूडमधील ‘रन बेबी रन’, ‘खिलाड़ी नं. 201’, ‘फोर्टी प्लस’, ‘जूनून’, ‘विशुद्धि और काला धनी धमाल’, सारख्या चित्रपटामध्ये देखिल तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटलवला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची भन्नाट केमिस्ट्री असणाऱ्या ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…










