एकामागून एक हिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर विश्वासार्ह अभिनेता बनलेल्या आयुष्मान खुराणाने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच त्याच्या आवाजाने देखील चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. नुकताच त्याचा आगामी ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात आयुष्मानसोबत चित्रपटाची नायिका वाणी कपूर देखील आहे. या गाण्यातील आयुष्मान आणि वाणीचा स्वॅग तुम्हालाही नक्कीच थक्क करेल. या गाण्यामध्ये दोघांनी धमाल केली आहे. यात वाणी आणि आयुष्मानच्या डान्स स्टेप्स अप्रतिम दिसत आहेत. तसेच या गाण्यात आयुष्मान पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
‘चंदीगढ करे आशिकी’च्या टायटल ट्रॅकच्या प्रदर्शनाची माहिती देताना आयुष्मानने सोशल साइट्सवर लिहिले, “भांगडा जब आशिकी से मिल है. मनू और मानवी.” हे टायटल साँग सचिन-जिगर, जस्सी सिद्धू आणि आयपी सिंग यांनी गायले आहे. हे गाणे आधीच सुपरहिट झाले आहे. गायक जस्सी सिद्धूने मूळ वर्जनला त्याचा आवाज दिला, तर गाण्याचे बोल गीतकार मदन जालंधरी यांनी लिहिले आहेत. तर नवीन गीत आयपी सिंग यांनी लिहिले आहेत. बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट संगीतकार जोडी सचिन-जिगरने हे पुन्हा तयार केले आहे. हे गाणे येताच प्रेक्षकांच्या ओठावर आहे.
काही दिवसांपूर्वी ‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चाहत्यांना ट्रेलर खूप आवडला आहे. ३ मिनिटे १३ सेकंदांचा हा ट्रेलर चित्रपटात सर्व प्रकारच्या भावना असल्याचे दाखवतो. समोर येत असलेल्या या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. या चित्रपटात वाणी कपूर एका तृतीपंथीच्या भूमिकेत आहे.
‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटातील आयुष्मानचा लूक पंजाबच्या गब्रू जवानासारखा आहे. या लूकमध्ये आयुष्मान खूपच कम्फर्टेबल दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूप आवडत आहे.
‘चंदीगढ करे आशिकी’ १० डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सध्याच्या काळातील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक अभिषेक कपूर यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘केदारनाथ’, ‘फितुर’ आणि ‘काय पो छे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात योगराज सिंग, अभिषेक बजाज आणि कंवलजीत सिंग सारखे उत्कृष्ट पात्र कलाकार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…
-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत