Monday, July 1, 2024

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘नदियों पार’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री, पाहून नोरा फतेही म्हणाली, ‘उर्वशीचा डान्स लय…’

नुकताच काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार 2021चा सोहळा पार पडला आहे. येत्या 21 एप्रिलला कलर्सवर फिल्मफेअर अवॉर्ड 2021 चे टेलिकास्ट केले जाणार आहे. यामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री उर्वशी रौतेला या शोचा सूत्रसंचालक मनिष पॉल याच्यासोबत ‘नदियों के पार’ या गाण्यावर डान्स करत आहे.

हा डान्स झाल्यावर जेव्हा मनीष नोरा फतेही हिला विचारतो की, आमचा डान्स कसा होता?? यावर नोरा म्हणते की, “उर्वशीचा डान्स लय भारी होता, पण तुझा खूप खराब होता.” यावर तिथे असलेले सगळेजण जोर जोरात हसू लागतात.

कलर्स चॅनलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “उर्वशी आणि मनीष पॉलने लावले जोरदार ठुमके त्यांचा हा डान्स बघायला तुम्ही तयार आहात का? बघा #filmfareaward.” हा व्हिडिओ पाहून सगळेजण मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत, आणि या व्हिडिओला रिट्विट करत आहेत. त्यांच्या या डान्सला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी 66‌ वा फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन केले होते, यामध्ये जवळपास सगळे दिग्गज कलाकार पोहोचले होते. यामध्ये आयुष्यमान खुराना, नेहा धुपिया, राजकुमार राव, नोरा फतेही, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना सन्मानित करण्यात आले. तसेच ‘अंग्रेजी मीडिअम’ या चित्रपटासाठी दिवंगत अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘थप्पड’ चित्रपटासाठी तापसी पन्नू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला‌.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!

-‘सदाबहार’ अभिनेत्री रेखा यांचा ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ गाण्यावर अप्रतिम डान्स, पाहून जजही गेले भारावून

हे देखील वाचा