Monday, July 1, 2024

बॉलिवूड अभिनेत्रींनी लुटला दिवाळीचा आनंद, सोबत दिसला प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा

दिवाळी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे. आयुष्यातील सर्व चिंता विसरून सगळ्यांना एकत्र आणणारा हा सण आहे. या वेळी कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येतात आणि आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करतात. अशातच अनेक बॉलिवूड कलाकार देखील त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत हा सण साजरा करत आहेत, एकत्र वेळ घालवत आहेत. अनेक कलाकार पारंपारिक वेशातील फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच बॉलिवूडमधील काही कलाकारांचे दिवाळी साजरी करताना फोटो समोर आले आहेत.

फिल्मफेअरने काही कलाकारांचे दिवाळी सणामधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि मनीष मल्होत्रा हे दिसत आहेत. चौघेही डिनर टेबलवर बसून जेवण करताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला आकाश कंदील लावला आहेत. तसेच, लाईटच्या माळा लावलेल्या दिसत आहे.

या फोटोमध्ये जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी पांढऱ्या रंगाच्या ड्रेस घातला आहे, तर खुशी कपूरने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्स घातलेली दिसत आहे. तसेच मनीष मल्होत्रा फॉर्मल शर्टमध्ये दिसत आहे. ते चौघेही खूप आनंदात दिसत आहे. (Film fare share a janhavi kapoor, khushi kapoor, Manish Malhotra and sara ali khan photo while taking dinner)

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे. तसेच त्यांचे चाहते त्यांना दिवाळीच्या शुभेच्या देत आहेत.

जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली आहेत. तसेच मनीष मल्होत्रा हा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. अनेक अभिनेत्रींचे ड्रेस त्याने डिझाईन केले आहेत. सारा अली खान आणि जान्हवी कपूर या नुकतेच त्यांच्या केदारनाथ ट्रिपवरून परत आल्या आहेत.

सारा अली खान लवकरच तिच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच जान्हवी कपूर ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना २’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

-टेलिव्हिजनवरील ‘संस्कारी सून’ दिसली बोल्ड अवतारात, रश्मीचे बिकिनी फोटो पाहून कलाकारही म्हणतायत, ‘ओहो उफ्फ’

-शाहिदने बेडरूममधील फोटो केला शेअर, पाहून पत्नी मीरा म्हणाली, ‘तू स्वत:ला संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ…’

हे देखील वाचा