Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड अरे बापरे! दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले होते सापाला किस करायला, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

अरे बापरे! दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले होते सापाला किस करायला, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

सुपरस्टार देव आनंद आणि वहीदा रहमान यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गाईड’ अजूनही प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार करण्यात आला होता. हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले, तर इंग्रजी चित्रपटाला वेगळ्या क्लायमॅक्समुळे विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘गाईड’ चित्रपटाला इंग्रजीमध्ये टड डॅनिएलेस्की यांनी दिग्दर्शित केले होते.

जेव्हा हा चित्रपट इंग्रजीमध्ये शूट केला जात होता, तेव्हा दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले की, तुम्हाला गारुड्यासोबत डान्स करायचा आहे आणि खऱ्या सापाला पकडून त्याच्या तोंडाला किस करायचे आहे. हे ऐकून वहीदा हसू लागल्या आणि म्हणाल्या, “हे कसे होईल?” हे ऐकून दिग्दर्शकाने वाद घालण्यास सुरुवात केली आणि म्हणाले की, “हे भारतात सामान्य आहे.”

वहीदा यांनी दिग्दर्शकाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या की, “तुम्हाला भारताबद्दल चुकीची माहिती आहे. साप पकडणे आणि त्याच्या तोंडावर किस करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.”

त्यावेळी सेटवर मोठमोठया लाईट्स चालू होत्या, गरमीमुळे पेटीतील साप बाहेर आला. साप बाहेर फिरत असल्याची बातमी सेटवर पसरताच, सर्वप्रथम दिग्दर्शक साहेबांनी तिथून धूम ठोकली. थोड्याच वेळात साप पकडला गेला आणि दिग्दर्शकाला सेटवर परत बोलवण्यात आले, तेव्हा वहीदा रहमान म्हणाल्या, “तुम्ही तर पळून गेलात.”

वहीदा यांचे बोलणे ऐकून दिग्दर्शक म्हणाले, “मला सापांची भीती वाटते, मी भारतीय नाही.” मग वहीदा म्हणाल्या, “तुमच्याप्रमाणे मलाही सापांची भीती वाटते, तुम्ही सापाला किस करण्याचा सीन काढून टाका आणि बाकीचे गाणे चांगले शूट करा.” मग दिग्दर्शकाला समजले की सापाला किस करणे सोपे नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कारकिर्दीच्या सुरुवातीला राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; पत्नी सुनीतामुळे बनला ‘सुपरस्टार’

-टीव्ही जगातल्या ‘दादी’ सुरेखा सिक्री यांनी विविध भूमिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं! एकेकाळी उपचार घेण्यासाठीही नव्हते पैसे 

-‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा